KK च्या मृत्यूनंतर पत्नी कृष्णाच्या 'त्या' पेंटिंगची चर्चा

लोकप्रिय गायक केकेच्या मृत्यूनंतर त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत.
KK च्या मृत्यूनंतर पत्नी कृष्णाच्या 'त्या' पेंटिंगची चर्चा
esakal
Updated on

लोकप्रिय गायक केकेच्या मृत्यूनंतर त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. १९९१ साली केकेनं आपली लहानपणीची खास मैत्रिण ज्योती लक्ष्मी कृष्णा सोबत लग्न केलं होतं. ज्योती ही एक अर्टिस्ट आहे. केकेच्या निधनानंतर पत्नी कृष्णाच्या एका पेंटिंगची चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये तिनं केकेच्या आवाजाच्या भावना पेंटिंगमध्ये उतरवल्या आहेत.

KK च्या मृत्यूनंतर पत्नी कृष्णाच्या 'त्या' पेंटिंगची चर्चा
Filmy आहे KK ची 'लव्ह स्टोरी', असं मिळवलं होतं बालपणीचं प्रेम...

केकेने वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीनं त्याची रेखाटलेली पेंटिंग चर्चेत आली आहे.

एका परफॉर्मंस दरम्यान केके गात असलेल्या क्षणाची ही पेंटिंग आहे. तिनं रेखाटलेली ही पेंटिंग आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पेंटिंग शेअर करताना तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खरतंर ही पेंटिंग २०२० मधील आहे.

KK च्या मृत्यूनंतर पत्नी कृष्णाच्या 'त्या' पेंटिंगची चर्चा
VIDEO: अखेरच्या क्षणात KK सोबत काय काय घडलं? समोर आली माहिती

मी ही पेंटिंग काल पुर्ण केली. सिंधू आणि कपिल या माझ्या जवळच्या मित्रांनी मला कमीशन दिलं होतं. त्यासाठी त्यांनी मला स्वतंत्र्य वेळ दिला. तिला पक्क माहिती होत की मी हे पेंटिंग ३ दिवस, ३ महिन्यात नाहितर एक वर्षात का होईना हे पेंटिंग पुर्ण करेन.

केकेचा मी हा क्षण तेव्हा कैद केला होता जेव्हा काही वर्षांपूर्वी मी के ला लीसेस्टरशायरमध्ये परफॉर्म करताना पाहिले तेव्हा हा क्षण मी कॅप्चर केला होता. तो त्याच्या आवाजाने जी उर्जा उत्सर्जित करतो ते केवळ माझ्यासाठी रंगांनी वर्णन केले जाऊ शकते. अशी भावना तिनं यावेळी व्यक्त केली होती.

खरंतर तिनं हे पेंटिंग सिंधू आणि कपिल यांच्या घरामध्ये भिंती सजवण्यासाठी रेखाटलं होता.

यापूर्वीही तिनं त्याची गात असलेली पेंटींग रेखाटलेली आहे. त्यावेळी तिनं 'हे खूप कठीण होते.... शेवटी ते केले. मला आनंद आहे की. तो गाताना मी त्याच्या भावना कॅप्चर करू शकलो. अशी भावना व्यक्त करत तिनं रेखाटलंल त्याच पेंटींग आपल्या इंस्टावर शेअर केल होत.

काही नाती अशी असतात जी प्रेमासाठी एक उत्तम उदाहरण आहे. त्यापैकी एक गायक केके यांचं पत्नीसोबत असलेलं नातं. आज केके आपल्यात नसला, तरी त्याने आपल्या गाण्यांमधून अनेकांनी दिलेली प्रेरणा आणि त्याचं पत्नीवर असलेलं प्रेम कधीचं संपणार नाही. शालेय जीवनापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केके संगीत आणि पत्नीसोबत एकनिष्ठ राहिला.

१९९१ साली केकेनं आपली लहानपणीची खास मैत्रिण ज्योती लक्ष्मी कृष्णा सोबत लग्न केलं होतं. ज्योतीसोबत केके ची पहिली भेट ही इयत्ता ६ वी मध्ये झाली होती. केकेनं आपल्या लेडी लव्हसोबत लग्न करण्यासाठी सेल्समनची नोकरी केली होती असा खुलासा कपिल शर्माच्या शोमध्ये त्यानं केला होता.

मंगळवारी ३१ मे रोजी,एका लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान केके ला हृद्यविकाराचा झटका आला. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अटॅक आल्यानंतर केकेला थेट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. पण तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com