esakal | लॉकडाऊननंतर 'पाखर' लघुपटाचं हॉलीवूडमध्ये होणार स्क्रिनिंग.. सोशल मिडीयावर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

pakhar

मुलं आणि पालक यांच्यातील नातेसंबंधांचे वास्तव दर्शविण्याचा प्रयत्न करणारी ही एक सामाजिक कथा आहे..

लॉकडाऊननंतर 'पाखर' लघुपटाचं हॉलीवूडमध्ये होणार स्क्रिनिंग.. सोशल मिडीयावर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- नातेसंबंधांवर भाष्य करणारी “पाखर” या शॉर्टफिल्मची अधिकृत निवड “लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये” झाली असून ही फिल्म हॉलिवूडमधील लॉस अँजेलेसच्या पाईनवूड स्टुडिओ आणि रेलेह स्टुडिओमधे दाखवली जाणार आहे. 

हे ही वाचा: सुनिधी चौहान आणि जावेद अली यांची दोन हृदयस्पर्शी गाणी प्रेक्षकांच्या भेटीला

मुलं आणि पालक यांच्यातील नातेसंबंधांचे वास्तव दर्शविण्याचा प्रयत्न करणारी ही एक सामाजिक कथा आहे.. मुलांची बदलती वृत्ती आणि कृती, वृद्ध आई-वडिल आपल्यावर ओझे असल्याची त्यांची भावना, या भावनेमुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे बदलत जाणारे जीवन परिणामी, गंभीर दुःख भोगण्याची आलेली वेळ. यामधूनच लघुपटाच्या सरतेशेवटी अनपेक्षितपणे घडलेली घटना आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करेल.  

सचिन फदाले यांच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या या शॉर्टफिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन सुराज कुटे यांनी केलं आहे. अविका एंटरटेन्मेंटच्या प्रमुख तृषाली फदाले यांनी या शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. अभिषेक पांचाळ यांनी छायांकन आणि संकलन, प्रज्ञेश फुलसुंडे यांनी डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, स्नेहल यशवंतराव आणि विशाल शिंदे यांनी ध्वनी आरेखन,  गणराज मधू यांनी गीतलेखन, देवांग अहिरराव यांनी संगीताची जबाबदारी निभावली आहे.तर हरिश्चंद्र भांडारे, उर्मिला डांगे, सचिन फदाले,सुभाष मुंडे, स्वप्नाली केळजी, अंजली यादव, सीताराम फदाले, प्रज्ञेश फुलसुंडे, साक्षी गायकवाड, अश्विनी मलिक, रवींद्र जैद, संतोष काळे यांच्या या शॉर्टफिल्ममध्ये भूमिका आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपट निर्मितीचा कोणताही अनुभव नसताना या तरुणांनी एकत्र येऊन ही शॉर्टफिल्म केली आहे. आजच्या काळाशी सुसंगत अशी कथा या शॉर्टफिल्ममध्ये मांडण्यात आली असून, युट्यूबवर या शॉर्टफिल्मला भरभरून प्रतिसाद मिळत आहे..

pakhar a marathi short film Screening will be held in hollywood after lockdown

loading image