Sajal Ali: 'हनी ट्रॅप'च्या आरोपामुळे संतापली पाकिस्तानी अभिनेत्री, 'माझा देश...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sajal Ali

Sajal Ali: 'हनी ट्रॅप'च्या आरोपामुळे संतापली पाकिस्तानी अभिनेत्री, 'माझा देश...'

पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका 'मॉम' या चित्रपटात केल्याने लोकप्रिय झाली होती. तसेच सजल अलीचे 2017 मध्ये आलेल्या या चित्रपटातील अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. सजल वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सजल अलीचे 'हनी ट्रॅप' प्रकरणात नाव पुढे आले आहे.

मेजर आदिल राजा हे पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. मेजर आदिल राजा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनल आणि व्लॉगवर एक खळबळजनक खुलासा केला आहे की, पाकिस्तानी अभिनेत्रींचा पाकिस्तानातील शक्तिशाली लोक हनी ट्रॅपमध्ये वापर करत आहेत.

निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री सजल अलीनं ट्वीटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. सजलने ट्वीटमध्ये लिहिले आहे, 'आपला देश नैतिकदृष्ट्या कुरूप होत चालला आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. चारित्र्य हत्या हा पापाचा सर्वात वाईट प्रकार आहे.'

हेही वाचा: Bollywood: लंडन एअरपोर्टवर सतीश शाहसोबत वर्णद्वेष..अभिनेत्यानं एकाच वाक्यात केली फॉरेनर्सची बोलती बंद

निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा हे यूट्युबर आहेत. तसेच मेजर आदिल राजा यांचे 'सोलजर स्पिक्स' या नावाचे एक युट्यूब चॅनल देखील आहे. मेजर आदिल यांच्या चॅनलला 290,000 युझर्सने सबस्क्राइब केले आहे. आदिल राजा हे त्यांच्या यूट्युबर चॅनेलवर वेगवेगळे व्लॉग्स शेअर करतात.

आदिल राजा यांनी कोणत्याही पाकिस्तानी अभिनेत्रींच्या संबंधित केलेल्या दाव्यामध्ये कोणत्याही अभिनेत्रींचे नाव घेतले नाही. मेजर आदिल राजा यांनी फक्त अभिनेत्रींच्या नावामधील लेटर्सचा वापर केला आहे. MK, MH, KK, and SA या लेटर्सचा वापर आदिल राजा यांनी केला होता. यामधील SA हे नाव सजल अलीचे आहे, असे काहींचे मत होते. सजल अलीनं या सर्व प्रकरणावर रिप्लाय देऊन प्रतिक्रिया दिली.

सजल अलीबद्दल बोलायचे झाले तर ही पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सजल अलीने 2009 मधील नादानियां या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. सजल अलीने श्रीदेवी यांच्या मॉम या हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. तसेच जिंदगी कितनी हसीन है, खेल खेल मै या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे. सजल अलीने मेरी लाडली, ये दिल मेरा, कुछ अनकही या मालिकेमध्ये पण काम केले आहे.