esakal | पाकिस्तानी मॉडेलचा विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह; हत्येचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

Nayab Nadeem

पाकिस्तानी मॉडेलचा विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह; हत्येचा संशय

sakal_logo
By
स्वाती वेमूल

पाकिस्तानी मॉडेल नायाब नदीमचा Nayab Nadeem मृतदेह लाहोरमधील तिच्या राहत्या घरी आढळला. नायाब २९ वर्षांची होती. नायाबचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नायाब ही डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी (DHA) फेज ५ या परिसरातील घरात एकटी राहत होती. रविवारी जेव्हा तिचा सावत्र भाऊ मोहम्मद अली तिला भेटायला गेला, तेव्हा त्याला तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला. (Pakistani model Nayab Nadeem found dead at home in Lahore slv92)

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मदच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नायाबच्या शरीरावर आणि गळ्यावर काही व्रण आढळले आहेत. नायाबच्या घरी जाण्याआधी मोहम्मदने तिला फोन केला होता. मात्र ती फोन उचलत नव्हती. तिच्या घराजवळील परिसरातून जात असताना त्याने तिला भेटण्याचं ठरवलं. मात्र घरी तिला मृतावस्थेत पाहून मोहम्मदला मोठा धक्का बसला. यावेळी नायाबच्या घराच्या वॉशरुमला लावलेली जाळीसुद्धा तुटलेल्या अवस्थेत दिसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. नायाब त्या घरात एकटी राहत होती आणि तिचं लग्न झालं नव्हतं.

लाहोरमधल्या डीएचए परिसरातच मे महिन्यात पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटीश महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळल्या होता. माया असं त्या महिलेचं नाव असून डोक्यात गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या दोन महिन्यांआधीच ती तिकडे राहायला आली होती.

loading image