'पानिपत' महाराष्ट्रात बघा आता टॅक्स फ्री!

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

'पानिपत' हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.

मुंबई : सदाशिवरावभाऊ पेशव्यांचा पराक्रम सांगणारा भव्यदिव्य पडद्यावरील 'पानिपत' हा चित्रपट महाराष्ट्र सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऐतिहासिक घटनांची सध्याच्या पिढीला नव्याने ओळख व उजळणी व्हावी यासाठी असे चित्रपट महत्त्वाचे असतात. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे चित्र उभे करणारा हा चित्रपट मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पेशव्यांचा या युद्धात पराभव झाला होता, तरीही त्या पराभवाच्या आठवणी आजही प्रत्येक मराठी मनात आहेत. अर्जून कपूर, कृती सेनन, मोहनीश बेहल यांच्या मुख्य भूमिका असलेला पानिपत बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गाजला.

Panipat Review : पानीपतमध्ये अर्जुन कपूरनं केलं आश्चर्यचकीत!

हा चित्रपट महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रेक्षकांनी पहावा, मराठ्यांच्या साम्राज्याचा पराक्रम सर्वांना कळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. 6 डिसेंबरला रिलीज झालेला हा चित्रपट आता महाराष्ट्रात स्वस्त दरात बघता येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panipat movie is tax free in Maharastra now