Pankaj Tripathi: एकेकाळी वादळात घराचं छप्पर उडालं होतं; आज राहतोय आलिशान घरात

अभिनेता पंकज त्रिपाठीचा आज वाढदिवस, अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देऊन त्याने हे यश मिळवलं आहे.
pankaj tripathi birthday : one room shed with tin roof in Patna to mumbai sea face flat success journey
pankaj tripathi birthday : one room shed with tin roof in Patna to mumbai sea face flat success journey sakal
Updated on

Pankaj tripathi birthday : पंकज त्रिपाठी हे नाव आज बॉलीवुडमध्ये अत्यंत मानाने आणि अदबीने घेतलं जातं. गेल्या काही वर्षांत पंकज यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांना पार वेडं केलं. चित्रपट असो किंवा वेब सिरिज.. पांकप त्रिपाठी असणार म्हणजे काहीतरी दर्जेदार असणार अशी लोकांची धारणा झाली आहे. पण हे सहज शक्य झालेलं नाही त्यासाठी पंकजने मोठा स्ट्रगल केला आहे. आज ५ सप्टेंबर रोजी त्याचा ४६ वा वाढदिवस. त्या निमित्ताने त्याच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना जाणून घेऊया..

(pankaj tripathi birthday : one room shed with tin roof in Patna to mumbai sea face flat success journey)

एक काळ असा होता की त्यांना कोणी ओळखत नव्हते. मनोरंजन विश्वात पाय रोवण्यासाठी त्यांची प्रचंड धावपळ सुरू होती. पंकज (pankaj tripathi ) मुंबईत येण्याआधी पाटणा येथे राहत होते. अत्यंत साध्या झोपडीवजा घरात त्यांचा संसार सुरू होता. त्यावेळी वादळात त्यांच्या घराचं छप्पर उडून गेलं होतं. पंकज एका मुलाखतीत म्हणाले होते, 'पाटणामधील पत्र्याचं छप्पर असलेलं आमचं घर मी अजूनही विसरलो नाही किंबहुना कधीच विसरणार नाही. एके रात्री खूप जोरात पाऊस पडत होता. वादळी वाऱ्याने आमच्या घराचं छप्परच उडालं होतं. मी आकाशाकडे एकटक पाहत स्तब्ध उभा होतो. त्यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण तेव्हा खऱ्या अर्थाने मी माझ्या नवीन घराचं स्वप्न पाहिलं", अशी आठवण पंकज यांनी सांगितली होती.

पंकज आणि त्यांच्या पत्नीने अत्यंत अत्यंत बेटाच्या परिस्थितीतून संसार केला आहे. ज्यावेळी पंकज अभिनय क्षेत्रात उभे राहत होते त्याचवेळी त्यांनी एका आलीशान घराचे स्वप्न पाहिले होते. आपलंही समुद्रकिनारी एक अलिशान घर असावं असं त्यांना वाटत होतं. ते स्वप्न २०१९ मध्ये पूर्ण झालं. अत्यंत स्ट्रगल करून पंकज यांनी मनोरंजन विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. २०१९ मध्ये त्यांनी मुंबईमध्ये समुद्र किनारी एक प्रशस्त घर खरेदी केले. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.

पंकज त्रिपाठीने 'मसान', 'मिर्झापूर', 'स्त्री', 'मिमी', 'क्रिमिनल जस्टीस', 'सेक्रेड गेम्स' यांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीला मिळेल त्या भूमिकेला होकार द्यायचं या विचाराने त्याने काम केलं. मात्र आता अत्यंत विचारपूर्वक भूमिकांची निवड करत असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com