pankaj tripathi kadak singh movie trailer released on zee 5 8 december
pankaj tripathi kadak singh movie trailer released on zee 5 8 december SAKAL

Kadak Singh Trailer: अंगावर काटा आणणारा पंकज त्रिपाठींच्या 'कडक सिंग' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?

पंकज त्रिपाठींच्या कडक सिंग सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय
Published on

पंकज त्रिपाठी अभिनित बहुप्रतिक्षित ‘कडक सिंग’ फिल्मचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ‘कडक सिंग’चा वर्ल्ड प्रीमियर गोव्यात इफ्फीमध्ये ‘गाला प्रीमियर्स’ मध्ये दाखवला गेला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कडक सिंग’मध्ये राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते पंकज त्रिपाठी, पार्वती थिरुवोथु तसेच बांगलादेशी कलाकार जया अहसान ह्यांच्यासह संजना सांघी प्रमुख भूमिकेत आहे.

(pankaj tripathi kadak singh movie trailer released on zee 5 8 december)

pankaj tripathi kadak singh movie trailer released on zee 5 8 december
Emmy Awards 2023: आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका, वीर दास, एकता कपूरने पटकावला पुरस्कार

ह्या चित्रपटात ए. के. श्रीवास्तव उर्फ कडक सिंग यांच्या आयुष्याची कहाणी दाखवली आहे. आर्थिक गुन्हे विभागाचे सहसंचालक असलेले कडक सिंग सध्या अॅम्निशिया आजाराशी झगडत आहेत.

कडक सिंग उर्फ एके यांच्या भूतकाळात घडलेल्या घटना ह्यात दाखवल्या जातात. ह्या घटनांमुळे एकेंना भुतकाळाशी काही ताळमेळ लागत नाही. एका बाजूला आर्थिक गुन्हे शाखा त्यांचा पाठलाग करतात तर दुसऱ्या बाजुला आपले मोडकळीला आलेले कुटुंबही त्यांना धरून ठेवायचंय. वेगवान आणि गुंतागुंतीच्या घटनांमुळे ट्रेलर उत्कंठावर्धक होतो.

या सिनेमात पंकज त्रिपाठी मुख्य भुमिकेत आहेच, त्यांच्यासोबतच परेश पाहुजा, वरुन बुद्धदेव हे कालाकार सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.

विझ फिल्म्स आणि केव्हीएन प्रोडक्शन ह्यांचा ओपस कम्युनिकेशन्सशी सहयोग असून, विझ फिल्म्स (आंद्रे टिमिन्स, विराफ सरकारी आणि सब्बास जोसेफ), एचटी कॉण्टेण्ट स्टुडिओ (महेश रामनाथन) आणि केव्हीएनने यांनी एकत्रितरित्या ‘कडक सिंग’ची निर्मिती केली आहे. श्याम सुंदर व इंद्रानी मुखर्जी हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत. ‘कडक सिंग’ 8 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शनासाठी zee 5 वर रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com