Pankaj Udhas Inspirational Story : शाहरुखला पहिला पगारसुद्धा पंकज उधास यांनीच दिला होता! गुजरातमधला जमीनदार असा बनला गझलसम्राट!

आपल्या स्वभावानं त्यांनी चाहत्यांना (Pankaj Udhas Inspirational Story) जिंकून घेतलं होतं. त्यांची लोकप्रियता अफाट होती. पण त्याहीपेक्षा ते माणूस म्हणून खूपच मोठे होते.
Pankaj Udhas  bollywood singer legend
Pankaj Udhas bollywood singer legend esakal

Pankaj Udhas News: पंकज उधासजींचं प्रत्येक गाणं हे कमालीचं वेदना सांगणारं होतं. पण ती वेदना जेव्हा त्यांचा सूर घेऊन यायची (Pankaj Udhas Death News) तेव्हा ती वेदना वाटत नव्हती हे विशेष. फार कमी गायकांना अशा प्रकारची सिद्धी प्राप्त होते. पंकज उधास हे त्यापैकी एक होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनं भारतीय (Pankaj Udhas Bollywood Singer) संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.

चिठ्ठी आयी है, आयी है. चिठ्ठी आयी है सारख्या गाण्यानं किती वर्ष प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला होता. साजनमधील जिये तो जिये (Pankaj Udhas Bollywood Song) कैसे बिन आपके या चित्रपटातील गाणं अजुनही चाहत्यांना घायाळ केल्याशिवाय राहत नाही. चाहता कोणत्याही वयातील असो तो जेव्हा पंकजजींचा आवाज ऐकायचा (Pankaj Udhas 90s song) तेव्हा तो वेगळ्याच संगीत विश्वाची सैर करुन यायचा असं म्हटलं जायचं. आजही गावाकडल्या रिक्षा, ट्रक, बसमध्ये पंकजींची ती गाणी चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

पंकजींची विषयी सांगायचे झाल्यासस १९८६ मध्ये आलेल्या संजय (Pankaj Udhas Latest News) दत्त, अमृता सिंग, पूनम ढिल्लो, कुमार गौरव आणि परेश रावल यांच्या नाम (Naam Movie) नावाच्या चित्रपटातील चिठ्ठी आयी है ही गझल कमालीची लोकप्रिय झाली होती. तब्बल तीन दशकांनंतरही ती गझल तितक्याच आवडीनं (Pankaj Udhas Gazal) ऐकली जाते. तसेच त्यांची चांदी जैसा रंग है तेरा नावाची गझलही चाहत्यांच्या मनात घर करुन गेली होती.

पंकज यांच्या त्या गझलनं चाहत्यांची पसंती मिळवली गोती. (Pankaj Udhas Boollwood Singer) त्यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. या सगळ्याला कारणीभूत त्यांचा स्वभावही होता. त्यांनी कधीच कोणत्याही गायकाविरोधात किंवा कोणत्याही सेलिब्रेटीविरोधात अपशब्द वापरल्याचे ऐकीवात नाही. किंवा ते कोणत्याही वादातही अडकून परडल्याचे दिसले नाही. आपलं गाणं आणि आपले चाहते यांच्याशी बांधिलकी ठेवत त्यांनी स्वताच्या नावाची मोहोर उमटविल्याचे दिसून आले.

रिक्षा, बस, ट्रकमध्ये ती गाणी ठरलेलीच... (Pankaj Udhas Popularity)

तुम्ही जर एखाद्या हायवे वरुन प्रवास करत असाल तर एखाद्या रिक्षा, टेम्पो किंवा ट्रकमधून त्यांची गाणी तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील. भारताच्या विविध राज्यात त्यांचा चाहतावर्ग आहे. त्यांच्या गाण्यांना मिळणारी पसंती मोठी आहे. कुठल्याशा ट्रकमध्ये ना कजरे की धार, ना मोतियो की हार तुम्हाला ऐकू येईल तर आणखी कोणती गझल तुम्हाला मोहात पाडेल हे सांगता येणार नाही.

Pankaj Udhas  bollywood singer legend
Pankaj Udhas death: आपल्या मागे किती संपत्ती ठेवून गेलेत पंकज उधास, कधी मिळाले होते 51 रुपये

१७ मे १९५१ मध्ये गुजरातमधील एका मोठ्या कुटूंबात पंकजींचा (Pankaj Udhas Born Family Background) जन्म झाला. त्या परिसरात मोठे जमीनदार म्हणून त्यांचे कुटूंब प्रसिद्ध होते. तुम्हाला माहिती आहे का, शाहरुखनला पहिला पगार हा पंकज उधास यांच्या (Shah Rukh Khan First Salery) एका कॉन्सर्टमधून मिळाली होती. असे म्हटले जाते. इंडियन एक्सप्रेसनं याबाबत वृत्त दिले होते. अभिनेता जॉन अब्राहमला देखील पहिला ब्रेक देण्याचे काम पंकज उधास यांनी केले होते.

Pankaj Udhas  bollywood singer legend
Pankaj Udhas Passed Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चुपके चुपके सखियो या गझलनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच समीरा रेड्डीला ब्रेक देण्यात पंकजजींचा मोठा वाटा होता असे म्हटले जाते. त्यांच्या और अहिस्ता किजिए बाते नावाच्या गझलमधून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

कुठे गिरवले संगीताचे धडे?

पंकज उधास यांनी गुजरामधील राजकोट येथील संगीत नाट्य अकादमीमध्ये तबला वाजविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ मनहर उधास हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com