फोटोग्राफर्सला पाहून चिडलेल्या तैमुरने पाहा काय केलं..

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 19 December 2020

नुकतंच एका व्हिडीओमध्ये तैमूर सततच्या फोटो आणि व्हिडीओला कंटाळल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई- अभिनेत्री करीना कपूर-खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर त्याच्या क्युटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो कुठेही असला तरी फोटोग्राफर्स त्याचा क्युटनेस कॅमेराबंद करण्यासाठी धडपडत अलतात. तैमुरचे देखील खूप चाहते आहे. अनेकदा या फोटोग्राफर्सना तैमुरनेच हात करत कॅमेरासाठी पोझ दिल्या आहेत.तो फोटोग्राफर्ससोबत फ्रेंडली राहत असून त्यालाही सेलिब्रिटींप्रमाणेच या लहान वयात पॅपराझीची सवय झाली आहे. मात्र नुकतंच एका व्हिडीओमध्ये तैमूर सततच्या फोटो आणि व्हिडीओला कंटाळल्याचं दिसून आलं आहे.

हे ही वाचा: ड्रग्स प्रकरणाचा सारा अली खानला बसला फटका, ‘या’ बिग बजेट सिनेमातून झाली हकालपट्टी  

‘वूंपला’ने तैमूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तैमूर फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्सला पाहून वैतागल्याचं दिसून आलं. तैमूर आणि करीनाला पाहिल्यानंतर फोटोग्राफर्स लगेचच या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ काढू लागले. मात्र, तैमूरला ते अजिबात आवडलं नाही आणि तो जोरात फोटोग्राफर्सच्या अंगावर ओरडला.करीना तैमूरला घेऊन तिच्या कारमधून उतरली. त्याचवेळी या दोघांचे फोटो टिपण्यासाठी फोटोग्राफर्स नेहमीप्रमाणे पुढे आले. मात्र यावेळी तैमुर नो फोटोज असं म्हणाला. इतकंच नाही तर करीना तैमूरला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने फोटोग्राफर्सला लाथ दाखवली.

तैमूर लहानपणापासूनंच प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे. त्याचे कोणतेही फोटो, व्हिडिओ असो ते सोशल मीडियावर काही क्षणात व्हायरल होत असतात. लवकरंच तैमुरसोबत खेळायचा हक्काचा साथीदार येणार आहे. करीना दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. या स्थितीतही करिना अनेक शूट्स करताना दिसून येतेय.

paprazzis timur scolded said no photo video viral on social media 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paprazzis timur scolded said no photo video viral on social media