'अनुपमा' फेम पारसने फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले इअरफोन्स; बॉक्स उघडताच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Paras Kalnawat

ट्विट करत पारसने Flipkart विरोधात व्यक्त केला संताप

'अनुपमा' फेम पारसने फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले इअरफोन्स; बॉक्स उघडताच..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका 'अनुपमा'मध्ये Anupamaa समरची भूमिका साकारणारा अभिनेता पारस कलनावतने Paras Kalnawat 'फ्लिपकार्ट' Flipkart या साइटवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात मोठमोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांकडून विविध ऑफर्स दिले जातात. यावर्षीसुद्धा 'फ्लिपकार्ट'ने सेल जाहीर केला. स्मार्टफोन्स, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स यांच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्स देण्यात आले. पारसने या ऑफरद्वारे फ्लिपकार्टवरून सहा हजार रुपयांचे इअरफोन्स खरेदी केले. मात्र जेव्हा पारसला त्याची डिलिव्हरी मिळाली, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. कारण बॉक्समध्ये काहीच नव्हतं. पारसने ट्विटरच्या माध्यमातून फ्लिपकार्टविरोधात तक्रार केली.

रिकाम्या बॉक्सचे फोटो पोस्ट करत पारसने लिहिलं, 'मला या बॉक्समध्ये काहीच मिळालं नाही. फ्लिपकार्टची सेवा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे आणि लवकरच लोकं त्यावरून वस्तू खरेदी करणं थांबवतील.' पारसच्या या ट्विटनंतर लगेच फ्लिपकार्टकडून उत्तर देण्यात आलं. 'माफ करा, तुमची समस्या आम्हाला समजली. आम्ही तुमची मदत करू. तुमचा ऑर्डर आयडी आम्हाला सांगा, ज्याद्वारे आम्ही त्याची माहिती घेऊ शकू', असं ट्विट फ्लिपकार्टने केलं.

हेही वाचा: Photos: ऐश्वर्या नारकरांच्या बोल्ड अंदाजापुढे तरुणीही पडतील फिक्या!

याआधीही अनेक ग्राहकांनी, सेलिब्रिटींनी फ्लिपकार्टविरोधात अशा पद्धतीची तक्रार केली. नुकत्याच घडलेल्या आणखी एका घटनेत एका व्यक्तीने फ्लिपकार्टवरून आयफोन १२ खरेदी केला होता. मात्र त्या व्यक्तीला डिलिव्हरीच्या बॉक्समध्ये फोनऐवजी चक्क साबण मिळालं होतं.

loading image
go to top