अक्षय कुमारला 'कॅनडियन' म्हणून ट्रोल करणा-यांना परेश रावलची चपराक..तर सलमानची केली स्तुती

paresh rawal
paresh rawal

मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलंय..या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी बॉलीवूडमधली अनेक मंडळी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेत आहेत..त्यात खिलाडी अक्षय कुमारने पीएम केअर्स फंडसाठी आत्तापर्यंतचं सर्वात जास्त योगदान दिल असल्याचं समोर आलं आहे..सुपरस्टार अक्षय कुमारने २५ कोटींची आर्थिक मदत करुन  सर्वात जास्त योगदान दिलं आहे..आणि यासाठी पंतप्रधान मोदींनीही त्याचे आभार मानले आहेत..तर दुसरीकडे अभिनेते परेश रावल यांनी अक्षयला कॅनडियन नागरिक म्हणून ट्रोल करणा-यांना चांगलीच चपराक लगावली आहे..

परेश रावल यांनी अक्षय कुमारला पाठिंबा देत ट्वीट केलं आहे..या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे, 'कोणत्या स्वार्थासाठी नाही, ना कोणत्या राजकिय करिअरबाबत अपेक्षा म्हणून, राजदूत किंवा सरकारवर उपकार म्हणून नाही..हा एक असा सज्जन नागरिक आहे जो अतिशय प्रामाणिकपणे आपल्या कर्माचं खातो आणि उस्फुर्तपणे दानही करतो..परंतु तरीही काही खालच्या दर्जाचे लोक अक्षय कुमारला कॅनडियन नागरिक बोलतात..

'सांगायचं झालं तर अभिनेता अक्षय कुमारकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे..परंतु त्याने भारतीय नागरिकत्वासाठी  अर्ज देखील केला आहे..यासोबतंच परेश रावल यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे..या ट्वीटमध्ये त्यांनी अक्षयची स्तुती करत लिहिलं आहे, 'खिलाडी जो सरळ मनाने खेळतो..तुझ्या सोबत काम केल्याचा मला गर्व आहे अक्षय कुमार..' असं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलंय..

इतकंच करुन परेश रावल थांबले नाहीतर तर त्यांनी सलमान खानच्या कामाचं देखील कौतुक केलं..सलमान खानने सिनेइंडस्ट्रीसोबत जोडल्या गेलेल्या दिवसावर कमाई असलेल्या २५ हजार कामगारांचे अकाऊंट डिटेल्स मागितले होते..सलमान त्याच्या बिईंग फाऊंडेशन अंतर्गत या २५ हजार कर्मचा-यांना आर्थिक मदत करणार आहे...त्यासाठी परेश यांनी सलमानचं कौतुक केलं आहे..'अत्यंत शूर मनाच्या सलमान खानला माझा सलाम' असं ट्वीट त्यांनी केलं आहे... 

भारतात कोरोना व्हायरस बाधितांची साखळी तोडण्यासाठी देशभरात २१ दिवसांचं लॉकडाऊन करण्यात आलं आहे..त्यामुळे दिवसाच्या कमाईवर पोट असणा-यांवर मोठं संकट आलं आहे...इंडस्ट्रीमधील या कामगारांना आणि इतर गरजुंना मदत करण्यासाठी बॉलीवू, हॉलीवूड, टॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतूनही कलाकारांनी पुढाकार घेत मदतीचा हात दिला आहे...

paresh rawal trolls people who called akshay kumar canadian citizen praises the actor for rs 25 crore donation  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com