parineeti chopra and raghav chadha wedding photo videos viral
parineeti chopra and raghav chadha wedding photo videos viralSAKAL

Parineeti Raghav Wedding: तो क्षण आला! परिणीती - राघव अखेर लग्नबंधनात, डोळ्यांचं पारणं फेडणारा भव्य लग्नसोहळा

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाने आज २४ सप्टेंबरला एकमेकांशी लग्न केलं
Published on

Parineeti Raghav Wedding News: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. उदयपूरला मित्र-मैत्रीण आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं.

गेल्या अनेक महिन्यांपासुन दोघांच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर या दोघांनी आज एकमेकांशी लग्न केलंय. परिणीती - राघव यांचा लग्नसोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता.

(parineeti chopra and raghav chadha wedding photo videos viral)

parineeti chopra and raghav chadha wedding photo videos viral
Gauri Kulkarni Engagament: आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने केला साखरपुडा?

परिणीती - राघव अखेर लग्नबंधनात

परिणीती चोप्रा ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री. तर राघव चढ्ढा हे आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार. एक दिग्गज राजकारणी तर दुसरी लोकप्रिय अभिनेत्री. प्रोफेशन जरी विरुद्ध असलं तरी प्रेमाच्या धाग्याने या दोघांना एकत्र आणलं.

परिणीती - राघवच्या लग्नसोहळ्याला आदित्य ठाकरे, आप प्रमुख अरविंद केजरीवाल आणि इतर राजकारणी आणि सेलिब्रिटी उपस्थित होते.

परिणीती - राघवच्या लग्नासाठी कडक नियम

आज २४ सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला आणि द ताज लेक पॅलेसमध्ये हा परिणीती - राघवचा लग्नसोहळा पार पडला

निक जोनस आणि प्रियंका या सोहळ्याला उपस्थित नव्हते. या सोहळ्याला जे मान्यवर उपस्थित राहणार होते त्यांना मोबाईल फोनची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांनी फोन घरी किंवा जिथे राहण्याची व्यवस्था केली असेल तिथे ठेवून सोहळा अटेंड करण्यासाठी यावे. असे सांगण्यात आले आहे. मोबाईलच्या कॅमेरावर स्टिकर लावण्यात आले.

मोबाईलमधून वेडिंग फोटो काढणे, शुट करणे याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे वेगळ्या प्रकारची माहिती सोशल मीडियातून व्हायरल होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.

परिणीती - राघवची संगीत सेरेमनी

लग्नाच्या आदल्या रात्री परिणीती - राघव दोघांच्या संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेत.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक हंसराज हंस यांचा मुलगा, सुप्रसिद्ध पंजाबी गायक नवराज हंस यांचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहायला मिळाला. कजरा मोहब्बत वाला सारख्या बॉलीवूड क्लासिक्स आणि दिल चोरी सदा हो गया आणि गुड नाल इश्क मीठा सारख्या पंजाबी हिट गाण्यांच्या मिश्रणाने त्याने पाहुण्यांचे मनोरंजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com