Code Name Tiranga : परिणीती चोप्रा, हार्डी संधूचा ‘कोड नेम तिरंगा’; फर्स्ट लूक रिलीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Code Name Tiranga News

Code Name Tiranga : परिणीती चोप्रा, हार्डी संधूचा ‘कोड नेम तिरंगा’; फर्स्ट लूक रिलीज

Code Name Tiranga News परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि हार्डी संधूचा चित्रपट ‘कोड नेम तिरंगा’ ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटातून पहिल्यांदाच परिणीती आणि हार्डी एकत्र दिसणार आहेत.

लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) इंडस्ट्रीत १० वर्षे पूर्ण केली आहेत. तिने गोलमाल अगेन, शुद्ध देसी रोमान्ससह अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा परिणीती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. परिणीतीचा ‘कोड नेम तिरंगा’ हा चित्रपट गायक-अभिनेता हार्डी संधूसोबत येत आहे.

हेही वाचा: Jhalak Dikhhla Jaa 10 : लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा अली असगर बाहेर

अभिनेत्रीने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट ॲक्शन थ्रिलर, स्पाय लव्ह स्टोरी असेल. चित्रपटात परिणीती रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कोड नेम तिरंगा’ रिभू दासगुप्ता दिग्दर्शित आणि भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.

चित्रपटात हे कलाकार दिसणार

हार्डी संधू याआधीही अनेकदा चित्रपटांमध्ये दिसला आहे. ‘83’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याआधी त्याने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अभिनेता असण्यासोबतच हार्डी एक लोकप्रिय गायक देखील आहे. या चित्रपटात शरद केळकर, दिव्येंदू भट्टाचार्य, शिशीर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती सारखे दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत.

हेही वाचा: Khatron Ke Khiladi 12 : ‘या’ स्पर्धकाने जिंकला शो; दिसला कारच्या चावीसह

ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार

चित्रपटाची निर्मिती टी-सिरीजने केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रिभू दासगुप्ता म्हणाले, माझ्या पुढच्या चित्रपटाचे नाव जाहीर करताना आनंद होत आहे. हा चित्रपट १४ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. आशा आहे की प्रेक्षकांना हा ॲक्शन एंटरटेनर आवडेल, जी सैनिकाच्या बलिदानाची स्टोरी आहे.

Web Title: Parineeti Chopra Harrdy Sandhu Code Name Tiranga First Look Release

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..