परिणितीला बॉयफ्रेंडनं दिला धोका; भावुक होत उलगडलं सत्य

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

परिणीतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिनं तिची ब्रेकअप स्टोरी सांगितली. या ब्रेकअपमुळे तिचं पूर्ण आयुष्य उध्वस्त झाल्याप्रमाणे वाटू लागलं होतं.

मुंबई : अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा जबरिया जोडीच्या प्रमोशनमध्य व्यस्त आहे. या सिनेमाची रिलीज डेट आता एक आठवडा पुढे गेली असून त्यामुळे परिणितीला आणखी एक आठवडा प्रमोशन करावं लागणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिनं तिची ब्रेकअप स्टोरी सांगितली. या ब्रेकअपमुळे तिचं पूर्ण आयुष्य उध्वस्त झाल्याप्रमाणे वाटू लागलं होतं.

परिणितीनं यावेळी तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं नाही मात्र तिनं ब्रेकअपनंतर तिचं आयुष्य कसं बदललं हे सांगितलं. परिणितीचं नाव सध्या असिस्टंट डायरेक्टर चरित देसाईशी जोडली जातं. मात्र अद्याप परिणितीनं हे नातं अद्याप सर्वांसमोर स्वीकारलेलं नाही. ती नेहमीच या सर्व अफवा असल्याचं सांगताना दिसते.

याआधी परिणिती कधीच तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणानं बोललेली नाही. ही पहिलीच वेळ आहे की, परिणिती तिच्या ब्रेकअप बद्दल एवढी उघडपणे बोलली आहे. परिणितीनं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत स्वतःची ब्रेकअप स्टोरी सांगितली. ती म्हणाली, तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी पूर्णपणे तुटले होते. मला वाटत होतं की मी या जगात एकदम एकटी पडले आहे. असं पहिल्यांदाच झालं होतं जेव्हा कोणी मला नकार देऊन निघून गेलं होतं. याआधी माझ्या आयुष्यात असं कधीच घडलं नव्हतं. यावेळी माझ्या घरच्यांनी मला खूप साथ दिली. मला त्यावेळी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा माझ्या घरच्यांची खूप गरज वाटत होती.

परिणिती सांगते, मी ब्रेकअपनंतर आणखी जास्त खंबीर आणि समंजस झाले. मी देवाची आभारी आहे की, की त्यानं माझ्या आयुष्या हा प्रसंग, ही वेळ खूप लवकर आणली. या ब्रेकअपमुळे मी बरंच काही शिकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parineeti-chopras heart break From ex boyfriend