परिणीती चोप्रा साकारणार दारुड्या 'मीरा'ची भूमिका 

वृत्तसंस्था
Thursday, 22 August 2019

आपल्या अभिनयाने बाॅविवूडमध्ये आपली वेगळीच छबी निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे परिणीती चोप्रा हाेय. अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. परिणीती चोप्रा लवकरच चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' मध्ये दिसणार आहे. हा हॉलीवूडचा चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' चा रिमेक असणार आहे. हा चित्रपट रिभु दासगुप्ता दिगदर्शित करत आहे.

मुंबई : आपल्या अभिनयाने बाॅविवूडमध्ये आपली वेगळीच छबी निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे परिणीती चोप्रा हाेय. अनेक चित्रपटांमध्ये तिने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. परिणीती चोप्रा लवकरच चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' मध्ये दिसणार आहे. हा हॉलीवूडचा चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन चा रिमेक असणार आहे. हा चित्रपट रिभु दासगुप्ता दिगदर्शित करत आहे.

अभिनेत्रीने चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग सुरु केले आहे. मेकर्सने चित्रपटात परिणीतीच्या भूमिकेशी निगडित पहिला लुक रिव्हील केला आहे. ज्यामध्ये ती खूप इंटेंस दिसत आहे. परिणीती रक्ताने माखलेली दिसत आहे.

अभिनेत्री म्हणून परिणीतीची प्रतिभा सर्वांसमोर येईल - रिभु
चित्रपटाच्या दिग्दर्शिका रिभु दासगुप्ताने सांगितले, 'हे एक इंटेंस थ्रिलर कॅरेक्टर आहे. माझ्याकडे परिणीतीसारखी अभिनेत्री आहे, जी त्या भूमिकेला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल. मला वाटते एक अभिनेत्री म्हणून तिच्याकडे देण्यासारखे खूप एकही आहे. एक अभिनेत्री म्हणू तिची प्रतिभा अद्याप समोर यायची बाकी आहे. या भूमिकेने लोकांना ते कळणार आहे.'

मी माझ्या पात्राच्या प्रेमात पडले आहे : परिणीती 
आपल्या भूमिकेबद्दल परिणीती म्हणाली, 'या चित्रपटात एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव मिळत आहे. असे वाटत आहे की, जसे काही मी एखाद्या हॉस्टेलमध्ये शिस्तबद्ध आयुष्य जगत आहे. तीनच काम आहे आयुष्यात शूट करा, अराम करा, आणि पुन्हा ते चक्र सुरु ठेवा. मी दररोज शूटिंगपासून मन वळवण्याचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते पण सेटवर जाण्यासाठी अधीर झालेली असते. मी माझे पात्र 'मीरा' च्या प्रेमात पडले आहे. मला तिच्यातच राहायला आवडू लागले आहे. 'मीरा' अल्कोहलिक आहे. अशाप्रकारची भूमिका मी कधीच साकारली नाहीये.'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parineeti's first look releases from 'The Girl on the Train', she will play the role of alcoholic 'Mira'