
Paris Fashion Week 2023: ऐश्वर्याच्या सौंदर्याला चँलेज नाहीच, भाचीसोबत रँम्प वॉक! नेटकरी म्हणे, 'भाचीपेक्षा मामीच....'
Paris Fashion Week 2023 : बॉलीवूडमध्ये ऐश्वर्या रॉयच्या नावाची जेवढी चर्चा होते तेवढी क्वचितच आणखी कोणत्या अभिनेत्रीच्या नावाची होत असेल. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या रॉय ही चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं मणिरत्नम यांचा पीएस १ आणि पीएस २ मध्ये केलेला अभिनय. यामुळे तिच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून येते.(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
माजी विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्यानं वयाच्या पन्नाशी मध्ये पदार्पण केलं असलं तरी तिचं दिसणं आणि पडदयावर वावरणं ही तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. आता ती पॅरिसच्या फॅशन वीक २०२३ मध्ये दिसली तेव्हा तिच्याविषयी पुन्हा एकदा चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यात केवळ ऐश्वर्याच नाही तर तिची भाची नव्या नवेली नंदा देखील होती. त्यांचा रॅम्प वॉकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यापूर्वी ऐश्वर्यानं तिच्या लेकीला आराध्याला घेऊन कित्येक सोहळ्यात हजेरी लावली आहे. तेव्हा तिनं फोटोग्राफर्सला पोझ देताना माझ्या लेकीला देखील त्यात थोडं झुकतं माप द्या. अशी लाडिकपणानं तक्रार पापाराझ्झींकडे केली होती. अंबानींच्या एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि आराध्या गेली असताना तो प्रसंग घडला होता. आता नव्या नवेली नंदासोबत ऐश्वर्यानं जेव्हा रँम्प वॉक केलं तेव्हा चाहत्यांचे भान हरपल्याचे दिसून आले आहे.
ऐश्वर्यानं सिक्विन गोल्डन गाऊन परिधान केला होता. याशिवाय तिनं डायमंड रिंग्स आणि गोल्डन हिल्सही घातली होती. तिच्या लूकवर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. कित्येकांनी ऐश्वर्याचे कौतुक केले आहे. तुला विश्वसुंदरी का म्हणतात हे तू पुन्हा एकदा सिद्ध केले आहेस. तुम्ही दोघीही खुपच सुंदर दिसता आहात. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
नव्यानं मिनी रेड ड्रेस परिधान केला होता. नव्या ही अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी लेक श्वेता बच्चनची मुलगी आहे. नव्या नवेली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या पोस्ट आणि पॉडकास्टला मिळणारा प्रतिसादही प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी नव्या नवेलीनं तिच्या लग्नाबाबत केलेलं वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते.