Pathaan: 'पठाण'ने आफ्रिकेतील लोकांना लावले वेड, 'झूमे जो पठाण' गाण्यावर केला जबरदस्त डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Pathaan: 'पठाण'ने आफ्रिकेतील लोकांना लावले वेड, 'झूमे जो पठाण' गाण्यावर केला जबरदस्त डान्स

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट जगभरात खूप पसंत केला जात आहे. यामुळेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज विक्रम करत आहे. पठाण या चित्रपटातील शाहरुख खानची केवळ अ‍ॅक्शन आणि अभिनयच पसंत केला जात नाही, तर चित्रपटातील गाण्यांनाही भरभरून प्रेम मिळत आहे.

पठाण चित्रपटातील गाण्यांची क्रेझ परदेशी लोकांमध्येही पाहायला मिळत आहे. याचे लेटेस्ट उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ.

या व्हिडिओमध्ये पठाण चित्रपटाच्या 'झूम जो पठाण' या टाइटल सॉंगवर पश्चिम आफ्रिकेतील लोक जोरदार नाचताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोन जोडपे गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत.

हे कपल शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणसारखे डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. पश्चिम आफ्रिकन कपलचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओला लाइक करत आहेत.

पठाणच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन एकूण १८ दिवस झाले आहेत. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी 18 व्या दिवशीही चांगली कमाई केली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, पठाण चित्रपटाने 18 व्या दिवशी एकूण 10.75 कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाने ही एकूण कमाई फक्त भारतातच सर्व भाषांमध्ये केली आहे. यासह, पठाण चित्रपटाचे एकूण कलेक्शन केवळ हिंदी चित्रपटांमध्ये 475.55 कोटी रुपये झाले आहे. त्याचबरोबर पठाण हा चित्रपट हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर भारतात या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एकूण ५७२ कोटींची कमाई केली आहे