Pathaan First Day First Show : पहिल्यांदा २६ जानेवारीची परेड! त्यानंतर 'पठाण',किंग खानचं आवाहन

किंग खानच्या पठाणची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. आता फक्त तो थिटएटरमध्ये प्रदर्शित होण्याची वाट प्रेक्षक पाहत आहे.
Pathaan First Day First Show
Pathaan First Day First Show esakal

Pathaan First Day First Show Shah Rukh Khan : किंग खानच्या पठाणची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. आता फक्त तो थिटएटरमध्ये प्रदर्शित होण्याची वाट प्रेक्षक पाहत आहे. तब्बल पावणेचार वर्षांच्या कालावधीनंतर शाहरुखचा पठाण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची उत्सुकता सर्वाधिक आहे.

पठाणची अॅडव्हान्स बुकींगही तुफान सुरु आहे. देशातल्या मेट्रो सी़टिजमध्ये पठाणला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. प्रदर्शनापूर्वीच पठाणनं बॉलीवूडच्या इतर काही चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. काही फिल्म क्रिटिक आणि ट्रेड अॅनालिस्टनं सांगितल्यानुसार, पठाण मोठी कामगिरी करण्याच्या तयारीत आहे.

Also Read - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

पठाणच्या अॅडव्हान्स बुकींगला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. चाहत्यांना त्यांच्या लाडक्या किंग खानचा तब्बल पावणे चार वर्षांच्या कालावधीनंतर चित्रपट पाहायला मिळतो आहे. याचाच सर्वाधिक आनंद आहे. सध्याच्या टॉप अॅडव्हान्स बुकींगमध्ये पठाणचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामध्ये पहिल्या दोन मध्ये केजीएफ २ आणि रणबीरच्या ब्रम्हास्त्रचे नाव आहे.

यासगळयात शाहरुखचे एक व्टिट समोर आले आहे. त्यामध्ये त्यांनी चाहत्यांना, प्रेक्षकांना २६ जानेवारीच्या निमित्तानं पहिल्यांदा रिपब्लिक डे ची परेड पाहण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर पठाण पाहायला या. असे म्हटले आहे. त्याचे आवाहन फॅन्सला भावले आहे. पठाणमध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Pathaan First Day First Show
Pathaan Row : 'कोण आहे शाहरुख खान?' आसामच्या मुख्यमंत्र्यांचा प्रश्न! फॅन्सचं जबरी उत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com