'झुमे जो पठाण' वर आंटी सुसाट सुटली! रस्त्यावरच नाचायला लागली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Viral Video

Pathaan Viral Video : 'झुमे जो पठाण' वर आंटी सुसाट सुटली! रस्त्यावरच नाचायला लागली

Pathaan Movie Bollywood king khan shah rukh khan trailer viral : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या पठाणची आता चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. गेल्या काही वर्षांपासून शाहरुखच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

शाहरुख आणि दीपिकाच्या पठाणमधील बेशरम रंग नावाचे गाणे व्हायरल झाले होते. त्यात दीपिकानं परिधान केलेली भगव्या रंगाची बिकीनी ही वादाचे कारण ठरताना दिसत आहे. त्याला आता धार्मिक आणि राजकीय रंग चढला आहे. काहीही झालं तरी शाहरुखचा पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका नेटकऱ्यांनी घेतली आहे.

Also Read - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

यासगळ्यात मात्र शाहरुखच्या चाहत्यांना त्याचा पठाण, टीझर, ट्रेलर आणि गाणी हे सगळं कमालीचे आवडले आहे. त्यातील एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काल पठाणचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला अवघ्या काही वेळातच लाखोंचे व्ह्युज मिळाले होते. चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी पठाणवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. आता त्यांना चित्रपटाचे वेध लागले आहे.

हेही वाचा: Pathaan Trailer: शाहरुखच्या पठाण ट्रेलरची यूट्यूबवर धमाल, 24 तासात पार केले इतके व्ह्यूज

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आंटीच्या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंटस येत आहेत. तिला पठाणमधील झुमे जो पठाण हे गाणे एवढे आवडले की ती चक्क रस्त्यावरच नाचायला लागल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यावर तिला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही कमालीच्या भन्नाट आहे. अनेकांनी तिचे कौतूक केले आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. त्या महिलेचे नाव साज खान आहे.

शाहरुखचा पठाण २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यामध्ये जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ या चित्रपटाची चर्चा आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये पठाणवरुन वातावरण गरम असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षानंतर पठाण मोठ्या पडद्यावर येतो आहे. यापूर्वी शाहरुख झिरोमधून प्रेक्षकांसमोर आला होता. या चित्रपटाचे बजेट २५० कोटी असून त्याचे मीडिया राईट्स हे शंभर कोटीला विकले गेले आहेत.