"शाहरुखनं एकहातीच सर्वांना धुतलं"; 'बॉयकॉट गँग' टॉप ट्रेंडिंग : Pathaan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan mpovie

Pathaan: "शाहरुखनं एकहातीच सर्वांना धुतलं"; 'बॉयकॉट गँग' टॉप ट्रेंडिंग!

नवी दिल्ली : मोठ्या कॉन्ट्रव्हर्सीनंतर अभिनेता शाहरुख खानचा पठाण सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला. दोन दिवसात या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. पण या सिनेमावर बहिष्कार घाला अशी मोहिम चालवणारा एक वर्ग सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाला होता. पण बहिष्काराची भाषा करणाऱ्या या गँगला शाहरुख खाननं चांगलीच धोबीपछाड दिल्याचं प्रत्यक्ष सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ठळकपणे दिसून आलं आहे. त्यामुळं आता ट्विटरवर #BoycottGang हा हॅशटॅग टॉप ट्रेंड करतो आहे. (Pathaan movie Boycott Gang in top trending on twitter Shah Rukh Khan single handedly washes everyone)

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पठाण सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. आज प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यानं शाहरुखच्या चाहत्यांसह सिनेमा लव्हर्सनी सिनेमाला मोठी गर्दी केली. त्यामुळं केवळ दोनच दिवसात पठाणनं जगभरात मिळून १०० कोटी रुपये कमावले. यामुळं पठाण सिनेमा दिवसभर चर्चेत राहिला, त्यावर लोक सोशल मीडिायात मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाल्यानं हा सिनेमा ट्रेंडमध्येही राहिला.

पण या ट्रेंडला विरोध करण्यासाठी पठान_मुव्ही_फ्लॉप असाही ट्रेंड सुरु झाला. दिवसाच्या शेवटपर्यंत पठाणच्या कौतुकानं सोशल मीडियावर फीवर गाठला. त्यानंतर संध्याकाळपर्यंत या सिनेमाविरोधात बहिष्काराची भाषा करणाऱ्या लोकांना 'बॉयकॉट गँग' असं संबोधत हा ट्रेंडही व्हायला लागला. यामध्ये नेटकरीही मोठ्या प्रमाणावर व्यक्त झाले.

काही जणांनी तर पठाण हा सिनेमाला मिळालेला प्रतिसाद बेशरम रंग गाण्यावरुन वाद निर्माण करणाऱ्या साध्वी प्राची आणि नरोत्तम मिश्रा यांना पाठवा अशी मागणी केलीए. तसेच शाहरुख खाननं एकहाती बॉककॉट गँगला उद्ध्वस्त केल्याचं म्हटलं आहे. कारण बॉयकॉट गँगवर इतकं प्रेशर होतं की, पठाणच्या पहिल्याच दिवशी त्यांची वाट लागली, अशा पद्धतीचे ट्विट्स अनेकांनी केले आहेत.