Pathaan Movie : चीनमध्ये रिलीज न होताच 10 कोटी डॉलरची कमाई करणारा 'पठाण' पहिलाच हिंदी चित्रपट

किंग खान शाहरुखच्या पठाणवर सध्या सगळीकडूनच कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून पठाण, त्यानं बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई हे सारे चर्चेत आले आहे.
Pathaan Movie
Shah Rukh Khan
Pathaan Movie Shah Rukh KhanEsakal

Pathaan Shah Rukh Khan Movie china box office record : किंग खान शाहरुखच्या पठाणवर सध्या सगळीकडूनच कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून पठाण, त्यानं बॉक्स ऑफिसवर केलेली कमाई हे सारे चर्चेत आले आहे. शाहरुखच्या या चित्रपटानं आतापर्यत सर्वाधिक कमाईचे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. त्यानं टॉलीवूडच्या केजीएफला देखील मागे टाकले आहे. आता वेगळाच विक्रम पठाणच्या नावावर नोंदला गेला आहे.

आमिर खानचा थ्री इडियट्स हा देखील चीनच्या बॉक्स ऑफिसवर कमालीचा लोकप्रिय झाला होता. मात्र तो चित्रपट अधिकृतरीत्या चीनमध्ये प्रदर्शित झाला होता. साऱ्या जगभरातून शाहरुखच्या पठाणला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे ज्या पठाणवर बंदी आणि बहिष्कार घालण्याची मागणी केली जात होती त्याच पठाणनं आता सहाशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Also Read - प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

पठाण हा चीनमध्ये प्रदर्शित न होताच त्यानं दहा कोटी डॉलरची कमाई केली आहे. डेडलाईननं दिलेल्या माहितीनुसार, पठाणनं १०३.६ मिलियन डॉलरची कमाई केली आहे. चीनमध्ये प्रदर्शित न होताच आतापर्यत या चित्रपटानं केलेली विक्रमी कमाई अनेकांच्या चर्चेचा विषय आहे.

Pathaan Movie
Shah Rukh Khan
Pathaan Box office Collection: ये नही रुकने वाली!, 'पठाण'ने 13व्या दिवशी केले इतक्या कोटींचे कलेक्शन

पठाणनं भारतातून सहाशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं केजीएफ, दंगल आणि थ्री इडियट्स यांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. ही बातमी ऐकताच शाहरुखच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानच्या दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार या दोन्ही चित्रपटांनी चीनमध्ये विक्रमी कमाई केली होती. त्यांचे रेकॉर्ड हे आता पठाणनं मोडले आहे. पठाण हा आता चीनी भाषेत देखील डब करण्यात आला आहे.

Pathaan Movie
Shah Rukh Khan
Viral Video : MSEB अधिकारी वीज तोडायला शेतात आले; मराठी शेतकऱ्याने इंग्रजीत झापलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com