Pathan Teaser: 'पठाण' च्या टीझरमध्ये खंडीभर चूका, शाहरुखची खिल्ली उडवत लोक म्हणाले... Shahrukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathan Teaser mistakes,fan noticed,memes viral

Pathan Teaser: 'पठाण' च्या टीझरमध्ये खंडीभर चूका, शाहरुखची खिल्ली उडवत लोक म्हणाले...

Pathan Teaser: बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खाननं त्याच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्तानं करोडो प्रेक्षकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. हे गिफ्ट म्हणजे त्याच्या बहुचर्चित 'पठाण' सिनेमाचा टीझर आणि त्याचं नवीन पोस्टर. (Pathan Teaser mistakes,fan noticed,memes viral)

हेही वाचा: Shahrukh Khan: बायकोइतकीच शाहरुखच्या आयुष्यात महत्वाची आहे 'ती', कोण आहे पूजा ददलानी?

यशराज बॅनर अंतर्गत बनलेल्या 'पठाण' सिनेमात शाहरुख व्यतिरिक्त दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाला वॉर फेम सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केलं आहे. 'पठाण' च्या टीझरवर आता लोक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण प्रशंसा करताना दिसत आहेत तर काही त्याच्यातील चुका काढताना दिसत आहेत. या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.ट्वीटरवर #Pathaan, #PathaanTeaserOn2Nov और #Shahrukhkhan असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. चला जाणून घेऊया लोकांना पठाणचा टीझर कसा वाटला आणि काय आहे त्यांचं मत.

सर्वात आधी शाहरुखची बर्थ डे पोस्ट...

पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत रिलीज केला जाणार आहे. या सिनेमातून शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करताना दिसणार आहे. याआधी तो २०१८ साली अनुष्का शर्मासोबत 'झिरो' सिनेमात दिसला होता. सध्या शाहरुखकडे 'पठाण' व्यतिरिक्त दाक्षिणात्य दिग्दर्शकाचा 'जवान' आणि राजकुमार हिरानीचा 'डंकी' सिनेमा आहे.

टीझर पाहून काही चाहत्यांचे म्हणणे पडले शाहरुख खानवर जॉन अब्राहम भारी पडणार...

काहींनी म्हटलंय शाहरुख खान सर्वांचा बाप आहे...

काहींनी पठाणला 'आग' म्हटलंय....

काहींनी पठाणमधील शाहरुखचा लूक पाहून 'डॉन २' मधील शाहरुख खान आठवल्याचं म्हटलं आहे.

पठाणचा टीझर पाहून चाहते म्हणालेयत,'अक्षय कुमार असता तर आणखीनं दमदार बनला असता सिनेमा...'

सिनेमाचे मीम्स देखील व्हायरल झाले आहेत.

जिथे एकीकडे पठाणच्या टीझरची प्रशंसा होताना दिसतेय तिथे दुसरीकडे लोक टीझरमधील चुका शोधून काढताना दिसत आहेत. टीझरच्या शेवटी शाहरुख खान फाइटर उडवताना दिसत आहे. या दरम्यान तो जखमी होऊन रक्तानं पूर्णपणे माखलेला दिसत आहे. पण तेव्हा तो अचानक संचारल्यासारखं करतो आणि चष्मा लावतो. याच सीनची काही लोकांनी खिल्ली उडवली आहे,या सीनमध्ये काहीच दम नसल्याचं लोक बोलू लागलेयत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'एवढा मार खाल्ल्यानंतरही याचा चष्मा डोळ्यावरनं पडला नाही'.