
रंग दे बसंतीचा प्लॉट हा वेगळा होता. यापूर्वी एखादी कथा अशाप्रकारे चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न कुणी केला नसल्याचे काही समीक्षकांचे म्हणणे होते.
मुंबई - प्रेक्षकांच्या मनावर देशभक्तीपर चित्रपटांनी उमटविलेला ठसा कायम आहे. अजूनही जेव्हा प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन असो हे चित्रपट प्रेक्षकांना देशाला मिळालेले स्वातंत्र्य किती प्रयासानं मिळालं आहे याची आठवण करुन देतात. अशा देशभक्तीपर चित्रपटांमधील लोकप्रिय डायलॉग खास वाचकांसाठी
फिल्म- रंग दे बसंती
अभिनेता- आर माधवन
देशभक्ति डायलॉग- कोई देश परफेक्ट नहीं होता..उसे बेहतर बनाना पड़ता है।
रंग दे बसंतीचा प्लॉट हा वेगळा होता. यापूर्वी एखादी कथा अशाप्रकारे चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न कुणी केला नसल्याचे काही समीक्षकांचे म्हणणे होते. वेशभुषा, छायाचित्रण, संवाद, संगीत आणि अभिनय यामुळे रंग दे बसंतीची उंची वाढली होती.
फिल्म-लक्ष्य
अभिनेता-ऋतिक रोशन
देशभक्ति डायलॉग- यह इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं।
ऋतिकच्या करिअरमधला एक महत्वाचा चित्रपट म्हणून लक्ष्य चित्रपटाचा उल्लेख केला जातो. अभिनेता फरहान अख्तरनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तरुणाईच्या पसंतीस उतरलेला चित्रपट म्हणून लक्ष्यचे नाव घेतले जाते. कोणतेही ध्येय नसलेल्या तरुणाचे जेव्हा देशाची सेवा करणे हे ध्येय होते तेव्हा त्याच्यात होणारा बदल लक्ष्यच्या माध्यमातुन दाखविण्यात आला आहे.
फिल्म- बेबी
अभिनेता-अक्षय कुमार
देशभक्ति डायलॉग- रिलीजियन वाला जो कॉलम होता है उसमें हम बोल्ड एंड कैपिटल में इंडियन लिखते हैं।
आपल्या ज्या गुप्तहेर संघटना आहेत त्याविषयी सर्वसामान्यांना माहिती नाही. ती गोष्ट त्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. देशाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पडद्याआडून काम करणारी सुरक्षा यंत्रणा त्यात काम करणारी माणसं त्यांचा थरारक प्रवास प्रभावीपणे बेबीतून दिग्दर्शक नीरज पांडे यांनी उलगडला आहे.
फिल्म- मंगल पांडे
अभिनेता- आमिर खान
देशभक्ति डायलॉग- ये आजादी की लड़ाई है, गुजरे हुए कल से आजादी, आने वाले कल के लिए।
मंगल पांडे जसा आमीरच्या लूकमुळे चर्चेत आला तसा तो त्याच्या अभिनयासाठीही लोकप्रिय झाला. स्वातंत्र्याच्या लढ्याची ठिणगी जिथे पडली तो लढा प्रेक्षकांना कमालीचा आवडला होता. दिग्दर्शक केतन मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.