

एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता. बाजीप्रभूंनी स्वतःच्या देहाची जणू काही तटबंदी करून घेतली होती. एक ढाल – एक तलवार घेउन लढणाऱ्या बाजीप्रभूंचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी बाजीप्रभू हे जणू महाकाळ म्हणून उभे होते. यावेळी बाजीप्रभू यांच्यासोबत त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, कोयाजीराव बांदल, रायाजीराव बांदल आणि बांदल सेनेच्या मराठी मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासांच्या पानांमध्ये दडलेलं हे वैभव रुपेरी पडद्यावर साकारण्यात आलं अन् प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आलमंड्स क्रिएशन्स निर्मित आणि ए.ए.फिल्म्स प्रस्तुत 'पावनखिंड'ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. (Pawankhind Movie Box Office Collection)
प्रसिद्ध ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी 'पावनखिंड'(Pawankhind) सिनेमाच्या कलेक्शनची आकडेवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. पावनखिंड सिनेमानं पहिल्या आठवड्यापासून जी घोडदौड सुरु केली होती ती दुसऱ्या आठवड्यातही कायम त्याच वेगानं सुरु ठेवली आहे. लोकांनी सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. पहिल्या आठवड्यात या सिनेमानं तब्बल १२ कोटी १७ लाख रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठव्यात शुक्रवारी या सिनेमानं १.०२ कोटी कमावले आहेत. शनिवारी १.५५ कोटी तर रविवारी १.९७ कोटींची कमाई केलीय. केवळ दहा दिवसांत या सिनेमानं एकूण १६.७१ कोटींचा व्यवसाय केला आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी तरण आदर्श यांच्या ट्वीटचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर करत 'हर हर महादेव' असं कॅप्शन दिलं आहे. 'पावनखिंड' या सिनेमात चिन्मय मांडलेकरनं शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अजय पूरकरनं शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. समीर धर्माधिकरी,अंकित मोहन यांनी देखील सिनेमात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.