या अभिनेत्रीने बनवला स्वतःचा 'होममेड ड्रेस', व्हायरल होतोय तिचा हा फोटो

payal
payal
Updated on

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाने भारतासह जगभरातील अनेक देशांचे कामकाज थांबवले आहे. करोनाचा फैलाव रोखण्यात यश न मिळाल्याने भारताने १४ एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच जण सोशल डिस्टंसिंग पाळत आहेत. जवळपास महिना झाला सर्वच जण घरात आहेत आणि सगळेच सध्या घरी राहून फारच कंटाळले आहेत. या क्वारंटाईनच्या काळात सामान्यांपासून ते कलाकारमंडळींपर्यंत आपला बराचसा वेळ सोशल मिडियावर घालवताना दिसत आहेत. या क्वारंटाईनमध्ये सोशल मिडियावर हॅशटॅश सेफ हॅण्ड चॅलेंज, अन्टिंल टुमॉरो चॅलेंज, साडी चॅलेंज, डॅल्गोना कॉफी चॅलेंज, पिलो ड्रेस चॅलेंज, मी एट 20 चॅलेंज, द गेश्चर चॅलेंज, पास द ब्रश चॅलेंज सारखे बरेच चॅलेंज ट्रेडिंग आहेत. हे चॅलेंज बऱ्याचशा सेलिब्रेटिंनी देखील स्वीकारले आहे. या सर्व चॅलेंजेसच्या दुनियेत आता एका अभिनेत्रीने क्वारंटाईन दिवसांत स्वतःचं हिडन टॅलेंट सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणले आहे. अभिनेत्री पायल राजपूतने तिचा स्वतःचा होममेड ड्रेस बनवला आहे. पायलने पिलो ड्रेस चॅलेंज स्विकारल्यानंतर तिने काहीतरी वेगळं करण्याचे ठरवले आणि घरीच राहून स्वतःचा होममेड ड्रेस बनवला आहे.

पायलने तिचा हा होममेड ड्रेस जुन्या वर्तमानपत्रांपासून बनवला आहे. या वर्तमानपत्रांपासून तिने मिनी स्कर्ट आणि बॅकलेस टॉप बनवला आहे. आणि हे घालून तिने तिचे फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत. हा फोटो शेअर करताना तिने, 'माझा नवीन ड्रेस कसा आहे? मेक एवरी आऊफिट काऊंट' असे कॅप्शन दिले आहे. स्कर्ट, टॉप आणि त्यावर एक बेल्ट असा वर्तमानपत्रांपासून बनवलेला ड्रेस तिच्यावर खूपच छान दिसत आहे. तिचे हे फोटोज सध्या सोशल मिडियावर फारच व्हायरल होत आहेत. तिच्या या ड्रेसवरून बरेचशे मिम्स देखील बनवण्यात आले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

How’s my new outfit? Make every outfit count #madewithstyle . P.c and styling @theessdee

A post shared by Payal Rajput (@rajputpaayal) on

अभिनेत्री पायल राजपूतने सपनो से भरे नैना, प्यार तुने क्या किया सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तर तिने हिंदीसह पंजाबी, तेलगू, तमिळ सारख्या भाषांमधील चित्रपटांत काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com