
हे गाणे जुबान नौतियाल आणि तुलसी कुमार यांनी गायले आहे. तर रश्मी विराग यांचे गीतलेखन आहे. गाण्याचे चित्रिकरण गोवा येथे झाले आहे.
मुंबई - नव्या दमाचे तरुण कलाकार त्यांच्यातील सर्जनशीलतेला सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे येत आहे. त्यातून त्यांचे टँलेंट जगासमोर आले आहे. पार्थ समथान आणि खुशाली कुमार यांचे एक रोमांटिक गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांचे पहले प्यार का पहला गम या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ते गाणं जो जीता वही सिकंदर चित्रपटातील प्रसिध्द गाणे पापा कहते है गाण्याचे रिमेक आहे.
सध्या पार्थ समथान आणि खुशाली यांच्या एका गाण्यानं सोशल मीडियावर हवा केली आहे. त्या गाण्याला अल्पावधीतच लाखोंच्या संख्येनं हीटस मिळाले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक म्युझिक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. पार्थनं त्याच्या सोशल अकाऊंटवरुनही त्या गाण्याचा टीझर प्रसिध्द झाला आहे. टी सीरिजच्या वतीनं या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
पार्थनं दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी 2021 रोजी मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आमच्या नव्या गाण्याचा टीझर तुम्हा सगळ्यांपुढे येतो आहे. आशा आहे की हे गाणे तुम्हाला खुप आवडेल. या गाण्यामध्ये पार्थ आणि खुशाली यांची अनोखी केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. हे गाणे म्हणजे त्यांची एक वेगळी लव स्टोरी म्हणावी लागेल असे आहे.
हे गाणे जुबान नौतियाल आणि तुलसी कुमार यांनी गायले आहे. तर रश्मी विराग यांचे गीतलेखन आहे. गाण्याचे चित्रिकरण गोवा येथे झाले आहे. हे गाणे म्हणजे जो जिता वही सिकंदर या चित्रपटातील पहला नशा गाण्याचे रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. 1996 मध्ये प्रदर्शित झालेला जो जिता वही सिकंदर सिनेमातील गीतलेखन जावेद अख्तर यांनी केले होते.