esakal | नाटककार शेखर ताम्हाणे यांचे कोरोनाने निधन

बोलून बातमी शोधा

Shekhar Tamhane
नाटककार शेखर ताम्हाणे यांचे कोरोनाने निधन
sakal_logo
By
टीम ई सकाळ

'सविता दामोदर परांजपे', 'तू फक्त हो म्हण', 'तिन्ही सांज', 'वेलकम जिंदगी' अशा नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे यांचे बुधवारी रात्री कोरोनाने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. ठाण्यातील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि जावई असा परिवार आहे. नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेते राजन ताम्हाणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.

शेखर ताम्हाणे यांचे 'सविता दामोदर परांजपे' हे नाटक खूप लोकप्रिय ठरले. या नाटकावर आधारित त्याच नावाचा चित्रपटदेखील आला होता. शेखर ताम्हाणे यांनी नाटकांबरोबरच अनेक एकांकिकादेखील लिहिल्या होत्या. नाटककार म्हणून त्यांना सामाजिक भान होते. मागील वर्षी कोरोना काळात नाट्यकर्मींसाठी मदत निधी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं कोरोनाने निधन झालं. शेखर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर बुधवारी रात्री त्यांनी या जगाचा निरोप घेतला.