पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय नेत्यांनी दिलीप कुमार यांना वाहिली श्रद्धांजली

'भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचं विलक्षण योगदान पिढ्यानपिढ्या लक्षात राहील'
dilip kumar
dilip kumar
Updated on

हिंदी सिनेसृष्टीतील 'कोहीनूर' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार Dilip Kumar यांनी बुधवारी (७ जुलै) अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर बुधवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अभिनयाची संस्था म्हणूनच त्यांची ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून PM Narendra Modi इतरही अनेक राजकीय क्षेत्रातील दिग्ग्जांनी सोशल मीडियाद्वारे दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. (pm modi other political personalities pays tribute to dilip kumar)

'सिनेसृष्टीतील आख्यायिका म्हणून दिलीप कुमार लक्षात राहतील. आपल्या अतुलनीय अभिनयाने त्यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांचं निधन म्हणजे आपल्या सांस्कृतिक विश्वाचे मोठे नुकसान आहे', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी शोक व्यक्त केला. 'भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचं विलक्षण योगदान पिढ्यानपिढ्या लक्षात राहील', अशा शब्दांत राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली.

dilip kumar
दिलीप कुमार यांनी पुण्यातील कॅन्टीनमध्ये केलंय काम
dilip kumar
महानायक दिलीप कुमार; पाकिस्तान ते भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रवेशाचा प्रवास

"सिनेक्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करणारे दिलीप कुमार आज आपल्यात राहिले नाहीत. माझ्या नजरेसमोर त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मी माध्यमिक शिक्षणाच्या कालखंडात जातो. त्यावेळी पुण्यातील जेजुरीत नायडू दौरच शूटिंग सुरू होतं. आम्ही सायकलवरून गेलो होतो. त्यावेळी पहिल्यांदा दिलीप कुमारांना पाहण्याची संधी मिळाली" असे शरद पवार म्हणाले.

"विधीमंडळ, राज्यसरकारमध्ये कामाची संधी मिळाल्यावर दिलीप कुमार आणि माझं एक वेगळं नात निर्माण झालं. माझ्यासाठी सभा घेण्यासाठी ते येत असतं. त्यांची लोकप्रियता भारतात नाही तर भारताबाहेर पण होती. दुर्देवाने ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना मी करतो" अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.

सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं होतं. पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी मुघल-ए-आजम, देवदास, नया दौर, ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’. राम और श्याम असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com