PM Modi नी देशवासियांना 'ही' सीरियल पाहण्याचे केले आवाहन, जाणून घ्या का?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना 'ही' सीरियल पाहण्याचे केले आवाहन
Narendra Modi On Swaraj Bharat Ke Sangram Ki Gatha
Narendra Modi On Swaraj Bharat Ke Sangram Ki Gatha esakal

PM Narendra Modi And Swaraj Bharat Ke Sangram Ki Gatha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीयांना मालिका पाहण्याचे आवाहन केले आहे. या मालिकेचे नाव आहे स्वराज : द कॉम्प्रिहेन्सिव्ह गाथा ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल. ही मालिका नुकतीच दूरदर्शनवर सुरू झाली आहे. यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील अपरिचित वीरांनी दिलेले बलिदानाविषयी दाखवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये या मालिकेचा उल्लेख केला होता.

Narendra Modi On Swaraj Bharat Ke Sangram Ki Gatha
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राचं अमेरिकेतलं आलिशान घर, पाहा इन्साइड फोटोज

पंतप्रधान म्हणाले, उत्तम उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील जनतेला 'स्वराज : द समग्र गाथा ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल' ही मालिका पाहण्याचे आवाहन केले आहे. हा उत्तम उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. याद्वारे देशाच्या नव्या पिढीला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या अपरिचित नायक-नायिकांची माहिती होईल.

मी तुम्हा सर्वांना ही मालिका पाहण्यासाठी वेळ काढण्याचे आवाहन करतो, जेणे करून या महान नायकांबद्दल आपल्या देशात एक नवीन जागरूकता पसरेल.

Narendra Modi On Swaraj Bharat Ke Sangram Ki Gatha
'लालसिंग चड्ढा' कवडीमोलात विकत घेतलं नेटफ्लिक्सनं, किंमत ऐकून रडवेल आमिर

मालिका ९ भाषांमध्ये डब

'स्वराज' ही मालिका दर रविवारी रात्री ९ वाजता दूरदर्शनवर दाखवली जाते. याचे ७५ भाग आहेत जे ७५ आठवडे दाखवले जातील. ही मालिका इंग्रजी आणि ९ विविध प्रादेशिक भाषांमध्ये डब केला जाईल. या भाषा तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, ओरिया, बंगाली, आसामी आहेत.

'वास्को द गामा' पहिल्या भागात दाखवला

पहिल्या भागात १९४८ मध्ये वास्को द गामाचा भारत प्रवास दाखवण्यात आला होता. आगामी भागांमध्ये स्वातंत्र्य लढ्यातील नेते दाखवले जातील जसे- राणी अबक्का, बक्षी जगबंधू, कान्हू मुर्मू आदी. १७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्याच्या विशेष स्क्रीनिंगमध्ये सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com