PM Narendra Modi : 'पगडी आणि डोकं…सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय?'

सध्या सोशल मीडियावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची कविता लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
PM Narendra Modi Pune Visit NCP MP Dr Amol Kolhe
PM Narendra Modi Pune Visit NCP MP Dr Amol Kolhe esakal

PM Narendra Modi Pune Visit NCP MP Dr Amol Kolhe : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक यांच्या नावानं दिल्या पुरस्कारानं गौरविण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची कविता व्हायरल होत आहे. त्या कवितेच्या माध्यमातून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का... असा सवाल विचारत सरकारला पुन्हा धारेवर धरले आहे.

सध्या सोशल मीडियावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची कविता लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय...असा परखड सवाल विचारत वेगळ्याच चर्चेला सुरुवात करुन दिली आहे. मोदींचा पुण्यात गौरव होत असताना त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया त्या कवितेच्या माध्यमातून दिली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

कोल्हे त्या कवितेत म्हणतात, पगडी म्हणाली डोक्याला, माझ्या मालकांची ओळख आहे ना तुम्हाला....ते असंतोषाचे जनक देशाला भरडणाऱ्या परकीय इंग्रजांविरुद्ध....तुमचे काय त्याच्यात देश भरडणाऱ्या महागाई विरुद्ध....गणेशोत्सवासारख्या धार्मिक कार्यक्रमानं त्यांनी बघता बघता देश सोडला.....तोच देश जाती आणि धर्माच्या नावानं पेटवणाऱ्यांविषयी तुम्ही कधीच का नाही बोलतात....ते हसत हसत जाऊन आले मंडालेला...

पण ते गरजले होते....सरकारचे डोके ठिकाणावर आहे का.....आता ही पगडी घालताना व्हावं एकदा चिंतन.....सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय.....सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय....खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या या कवितेनं आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुरु असलेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक घडामोडी याकडे कोल्हे यांनी आपल्या कवितेतून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

PM Narendra Modi Pune Visit NCP MP Dr Amol Kolhe
PM Narendra Modi : असा असेल नरेंद्र मोदींचा पुणे दौरा! विविध प्रकल्पांचे होणार उद्‌घाटन

मोदी यांची पुणे भेट, त्यांना लोकमान्य टिळक यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानं गौरविले जाणे याला बाकीच्या गोष्टींचा संदर्भ देण्याचा प्रयत्न डॉ.कोल्हे यांनी या कवितेच्या माध्यमातून केल्याचे दिसून येत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्या कवितेवर आलेल्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. नेटकऱ्यांनी कोल्हे यांचे कौतूक केले आहे. त्यांनी ज्या भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत त्याला पाठींबा दर्शवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com