आमीरच्या ट्विटला पंतप्रधान मोदींनी दिला 'असा' रिप्लाय!

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सिंगल युज प्लास्टिक' या मोहिमेला प्रोत्साहन देत एक ट्विट केलं आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे असा सल्ला त्यांनी लोकांना यावेळी दिला.  

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान विविध स्थरांवर समाजसेवा करतच असतो. त्याच माध्यमातून तो समाज कल्याणाचे अनेक विषय हाताळतो आणि त्याचसोबत समाजकल्यासाठी जागरुकता निर्माण करण्याचं कामही करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सिंगल युज प्लास्टिक' या मोहिमेला प्रोत्साहन देत एक ट्विट केलं आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी लोकांना यावेळी दिला.  

आमीरने ट्विट करताना लिहिलं की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सिंगल युज प्लास्टिक' चा वापर बंद करण्याच्या मोहिमेला आपण सर्वांनीच समर्थन दिलं पाहिजे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की  'सिंगल युज प्लास्टिक' चा वापर पूर्णपणे बंद झाला पाहिजे."

आमीरने ट्विटच्या माध्यमातून या मोहिमेला सर्मथन दिलं आहे आणि त्याला मोदींनी प्रतिसादही दिला आहे. आमीरचं ट्विटला रीट्विट करुन त्यांनी आभार मानले. एवढचं नाही तर, त्यांनी ट्विट करताना लिहिलं की, "सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी तुमचे आभार. तुमचे प्रोत्साहित करणारे शब्द इतरांना प्रेरणा देतील आणि या मोहिमेला मजबुतही करतील."

आमीर लवकरच 'लाल सिंह चढ्ढा' या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपटाचं लेखन अतुल कुलकर्णी यांनी लिहिला असून तो 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फॉरेस्ट गम्प' या चित्रपटापासून प्रेरित आहे. 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमीर या सिनेमातही वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. आमीरसोबत अभिनेत्री करीना कपूर खान या चित्रपटात असणार आहे. मात्र, या चित्रपटासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार असून तो पुढच्या वर्षी म्हणजे 2020 च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi replied to Amir Khans tweet