Tunisha Sharma Case : अटकेतील शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ; पोलिसांनी...

Tunisha Sharma Case
Tunisha Sharma Case
Updated on

मुंबई - टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला सहकलाकार शिझान खान याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. त्यामुळे आज पोलिसांनी त्याला कोर्टात हजर करून कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने शिझानची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढवली. (Tunisha Sharma Case news in Marathi)

Tunisha Sharma Case
NIA Raids : एनआयएकडून केरळमध्ये पीएफआयच्या 56 ठिकाणी छापेमारी; शस्त्र चालविण्याचे...

अधिक तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे 2 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने एका दिवसाने पोलिस कोठडी वाढवली. 24 डिसेंबर रोजी टीव्ही सिरीयलच्या सेटवरील स्वच्छतागृहात तुनिषाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

४ जानेवारी २००२ रोजी चंदीगढमध्ये ट्युनिशाचा जन्म झाला होता. टीव्ही मालिकांबरोबरच तिनं सिनेमांमध्येही काम केलं. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषाने खूप नाव कमावलं. तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'इश्क सुभान अल्ला', 'गब्बर पूँछवाला', 'शेर-ए-पंजाब: महाराजा रणजित सिंह' आणि 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या शोजमध्येही त्यांनी काम केले. तुनिषा "फितूर", "बार बार देखो", "कहानी 2: दुर्गा राणी सिंह" आणि "दबंग 3" सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली होती.

हेही वाचा जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com