esakal | City Of Dreams 2 Trailer; बाप जिंकणार की मुलगी?
sakal

बोलून बातमी शोधा

city of dreams

City Of Dreams 2 Trailer; बाप जिंकणार की मुलगी?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ज्या मालिकेनं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली अशी सिटी ऑफ ड्रीम्स या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी आणि हिंदी अशा दोन भागात ही मालिका प्रदर्शित झाली होती. त्यात मराठी अभिनेत्री प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. पॉलिटिकल ड्रामा म्हणून ही मालिका अनेकांच्या चर्चेचा विषय होती. आता या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (political mystery drama city of dreams season 2 coming back on hotstar yst88)

हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका प्रदर्शित झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची प्रतिक्षा होती. याविषयी अभिनेत्री फ्लोरा सैनीनं लिहिलं आहे की, गायकवाड यांच्या फॅंमिलीच्या दरम्यान पुन्हा एकदा नवे युद्ध रंगणार आहे. आणि ते युद्ध कोण जिंकणार, बाप की मुलगी असा प्रश्न तिनं या माध्यमातून विचारला आहे.

प्रिया आणि अतुल कुलकर्णी या मालिकेच्या लीड रोलमध्ये आहेत. त्यांच्या पूर्वीच्या सीझनमधील अभिनयानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या बरोबर उदय टिकेकर, एजाज खान, सचिन पिळगांवकर, गीतिका त्यागी यांच्या त्यात भूमिका आहेत. पहिल्या सीझनमध्ये आपण पाहिलं की, पक्षाची एक मोठी मिटिंग पार पडली आहे. जगदीश यांनी दिल्लीसाठी एक योजनही ठरवली आहे. यावेळी पौर्णिमेला बाबांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळते. अर्थात यापुढे काय होते हे दुसऱ्या सीझनमध्ये कळणार आहे.

हेही वाचा: 'चुना लावला वाटतं'; मेकअपमुळे श्रुती मराठे ट्रोल

नागेश कुकुनूरनं या मालिकेचं लेखन केलं तर दिग्दर्शन रोहित बनवलीकर यानं केलं आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच या मालिकेचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे त्याचे शुटिंग थांबले आणि त्याचा परिणाम मालिकेच्या प्रदर्शनावर झाल्याचे दिसुन आले.

loading image