Ponniyin Selvan I twitter Review: 'आतापर्यंतच्या ऐतहासिक सिनेमातील हा सर्वात...',पब्लिक खरं बोललं...

'पोन्नियिन सेल्वन'चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या ऐतिहासिक सिनेमाचा रिव्ह्यू करायला जोरदार सुरुवात केली आहे.
'Ponniyin Selvan -1', twitter review netizens mani ratnam asihwarya rai film on social Media.
'Ponniyin Selvan -1', twitter review netizens mani ratnam asihwarya rai film on social Media. Google

Ponniyin Selvan I twitter Review: मणिरत्नमचा पोन्नियन सेल्वन-१ आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्या प्रेक्षकांनी तर सोशल मीडियावर या ऐतिहासिक सिनेमाचा रिव्ह्यू करायला सुरुवातही केली आहे. बॉक्स ऑफिसवर 'विक्रम वेधा' सोबत मोठी टक्कर दिलेल्या या सिनेमाची ओपनिंग डे ची कमाई काय असेल हे तर आज रात्री ९ पर्यंत कळेलच. पण सिनेमा कसा आहे? याविषयी मात्र आपल्याला नक्कीच कळेल. आणि ते देखील सर्वसामान्य प्रेक्षकांकडून,कारण सिनेमा कसा वाटला हे त्यांच्याकडून जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं ठरेल. चला,जाणून घेऊया सिनेमागृहात आजच रिलीज झालेल्या 'पोन्नियिन सेल्वन' सिनेमाविषयी पब्लिक काय म्हणतंय.('Ponniyin Selvan -1', twitter review netizens mani ratnam asihwarya rai film on social Media)

'Ponniyin Selvan -1', twitter review netizens mani ratnam asihwarya rai film on social Media.
'तर थिएटर्सच्या स्क्रीन्स फाडून टाकू..', कॅनडात ऐश्वर्याचा 'पोन्नियन सेल्वन' अडचणीत

मणिरत्नचा पोन्नियिन सेल्वन -१ हा सिनेमा कल्कि कृष्णमुर्ती यांच्या उपन्यासवर आधारित सिनेमा आहे. हे पुस्तक पहिल्यांदा १९५५ मध्ये प्रकाशित केलं गेलं. पोन्नियन सेल्वनच्या निर्मात्यांनी हा सिनेमा रिलीज होण्याआधी सर्वप्रथम लेखक कल्कि कृष्णमुर्ती यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित केला. सिनेमाच्या निर्मात्यांनी यासंदर्भात ट्वीट करत लिहिलं होतं की,''पोन्नियिन सेल्वन उपन्यासामागे ज्या व्यक्तिची मेहनत आणि बुद्धि आहे,त्याच्या सम्मानासाठी आमच्याकडून ही छोटीशी पोस्ट,कल्किचं स्मरण आम्ही यानिमित्तानं करत आहोत''.

ज्यानं कुणी 'पोन्नियिन सेल्वन हे पुस्तक वाचलं आहे आणि त्यानंतर मणिरत्नमचा 'पोन्नियन सेल्वन-१' सिनेमागृहात जाऊन पाहिला आहे,त्यांना पुस्तकापेक्षा सिनेमा अधिक आवडल्याचं समोर आलं आहे. एका नेटकऱ्यानं 'पोन्नियिन सेल्वन -१' चा रीव्ह्यू करताना बाहुबली सिनेमातला एक सीन शेअर केला आहे. ज्यात कटप्पा मागून येऊन बाहुबलीला मारताना दिसत आहे. नेटकऱ्यानं पोस्टमध्ये कटप्पाला सिनेमा म्हणून आणि बाहुबलीला पुस्तक म्हणून दर्शवलं आहे.

काय म्हणालेत फर्स्ट डे फर्स्ट शो पहाणारे प्रेक्षक?

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'सिनेमातील कलाकार आणि व्हीएफएक्सनी या सिनेमात दम भरलाय'. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,'आतापर्यंत मी जितके ऐतिहासिक सिनेमे पाहिले आहेत,त्यामध्ये हा सिनेमा सगळ्यात उत्तम बनवला गेला आहे'. एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर एका सिनेमागृहातला व्ह्यू शेअर केला आहे. ज्या व्हिडीओत, ऐतिहासिक घटनेवर आधारित या सिनेमाला पाहताना लोकांच्या अंगावर काटा फुललेला दिसून येत आहे.

'पोन्नियिन सेल्वन -१' सिनेमा पाहिल्यानंतर लोक ऐश्वर्या राय-बच्चन आणि साऊथ सुपरस्टार विक्रमनं साकारलेल्या भूमिकांचे तोंडभरून कौतूक करत आहेत. शेवटी खरा रिव्ह्यू पब्लिकच करते. जे वाटतं ते थेट बोलते. तेव्हा हा रिव्ह्यू समजून घेत सिनेमा एकदा पहायला जायला काहीच हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com