Poonam Pandey Fake Death: स्वत:च्या मृत्यूची खोटी बातमी पसरवणे गुन्हा आहे का? काय सांगतात तज्ज्ञ

Poonam Pandey Fake Death News: पूनमचा हा पब्लिसिटी स्टंट होता की खरंच तिला कॅन्सरबाबत जनजागृती करायची होती हे तिच्या मनाला माहिती. पण, एखाद्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला आणि खोटी बातमी पसरवली तर गुन्हा दाखल होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Poonam Pandey Fake Death News
Poonam Pandey Fake Death Newssakal

Poonam Pandey Death News fake - पूनम पांडे हिच्या मृत्यूच्या बातमीमुळे चर्चांना तोंड फुटले होते. सर्व माध्यमांवर यासंदर्भातील बातम्या पाहायला मिळाल्या होता. पूनम पांडे समोर आली अन् तिने आपण गर्भाशयाच्या कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्यासाठी मृत्यूचा बनाव रचल्याचा दावा केला. त्यामुळे पूनमने जनतेसोबत प्रँक केल्याचं स्पष्ट झालं. ती जिवंत आहे या बातमीने सुद्धा नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (Poonam Pandey Fake Death Is it a crime to spread false news of one own death)

३२ वर्षीय पूनमचा सर्व्हिकल कॅन्सरने (Poonam Pandey Cervical Cancer News) मृत्यू झाल्याची बातमी तिच्या पीआर टीमने दिली होती. पूनमच्या कुटुंबियांनी आपला मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याशीही संपर्क होऊ शकला नव्हता. मृत्यूच्या बातमीनंतर एक दिवसांनी पूनम व्हिडिओच्या माध्यमातून अवतरली आणि तिने सर्वांनाच धक्का दिला.

पूनमचा हा पब्लिसिटी स्टंट होता की खरंच तिला कॅन्सरबाबत जनजागृती करायची होती हे तिच्या मनाला माहिती. पण, एखाद्याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला आणि खोटी बातमी पसरवली तर गुन्हा दाखल होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Poonam Pandey Fake Death News
Poonam Pandey: "मी मेले नाही, फक्त..."; उर्फी जावेदनं उडवली पूनम पांडेची खिल्ली

तज्ज्ञ काय सांगतात?

पूनम पांडे हिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण, तिच्याविरोधात कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होईल हा प्रश्न आहे. Advocate प्रतिभा घोरपडे यांनी याप्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे. पूनम पांडे हिने पब्लिसिटी स्टँट आणि कॅन्सरसंबंधी जनजागृतीसाठी मृत्यूची खोटी बातमी पसरवली असू शकते. पण, या बातमीमुळे कोणाची फसवणूक झाली नाही किंवा लोकांवर या बातमीचा वाईट परिणाम देखील झालेला नाही. त्यामुळे पूनमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.

Poonam Pandey Fake Death News
Poonam Pandey Death Fake News : 'पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू...' मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी काढला जाळ

प्रतिभा घोरपडे पुढे म्हणाल्या की, पूनमच्या मृत्यूच्या खोट्या अफवेचा लोकांवर किंवा लोकांच्या एका समुहावर परिणाम, भीती, धोका निर्माण झाला नाही. समाजात अशांतता निर्माण व्हावी किंवा देशाच्या विरोधातील कट असा तिचा हेतू नव्हता. तिचा दावा आहे की तिने हे सर्व लोकांमध्ये सर्व्हिकल कॅन्सरबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि लसीकरणाला प्रोत्साहन मिळण्यासाठी केलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की तिने केवळ पब्लिसिटी स्टंट केला आहे. काहीही असलं तरी तिचा मार्ग चुकीचा होता हे नक्की. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com