'सरकारला लाज वाटायला पाहिजे'; मोदींवर केली टीका 

popular actor prakash raj angry reaction on lpg price hike
popular actor prakash raj angry reaction on lpg price hike

मुंबई -  पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनंतर आता गॅसच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे सर्वसामान्यजणांचे धाबे दणाणले आहे. यावरुन मोदी सरकारवर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. त्यात बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी सर्वसामान्य लोकांची बाजू घेत सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे नागरिकांना मोठा आर्थिक मनस्ताप सोसावा लागत असल्याचे दिसून आले आहे. प्रसिध्द अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्यात त्यांनी अजून सर्वसामान्य लोकांना किती त्रास देणार असे म्हटले आहे.

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात एलपीजी सिलेंडरचे वाढलेले भाव डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहेत. प्रकाश राज यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. ते म्हणाले पेट्रोल दरवाढीनंतर आता सिलेंडरचे वाढलेले दर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार होत आहेत. प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत कशाप्रकारे वाढ झाली आहे त्याचा एक चार्ट शेअर केला आहे. त्यातून कशाप्रकारे सर्वसामान्य नागरिकांचे शोषण होत आहे याची माहिती त्यांनी दिली आहे.

गेल्या तीन महिन्यात गॅसची किंमत 225 रुपये प्रति सिलेंडर अशी झाली आहे. म्हणजे 15 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यत गॅस सिलेंडरमध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे. राज यांनी जे व्टिट केले आहे त्यात त्यांनी तारखेचा बेकायदेशीररित्या कशाप्रकारे वापर करण्यात आला आहे हे सांगितले आहे. प्रकाश यांच्या व्टिटवर लोकांनी आपला राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत ही 819 रुपये झाली आहे. त्याअगोदर ही किंमत 794 रुपये एवढी होती. देशभरात एलपीजीची किंमत ही सारखी असते. त्यावर सरकार सबसीडीही देत आहे. मात्र कोरोनानंतर सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वीही प्रकाश राज यांनी सरकारच्या काही धोरणांवर टीका केली आहे. मोदी सरकारवर टीका करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. दिल्लीतील शेतकारी आंदोलनावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. ते म्हणाले होते की, आताचा काळ असा आहे की, तुम्ही कोणाबरोबर बॉल गेम खेळणे पसंद करता, मात्र त्याशिवाय खेळणेही तुम्हाला चांगले जमते. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com