सहा महिने जगजीत गायले नाही,पत्नीनंही सोडलं होतं गाणं  

popular singer Jagjit Singh birthday special know all about the ghazal king
popular singer Jagjit Singh birthday special know all about the ghazal king
Updated on

मुंबई -  गझल गायकी म्हटलं की आजही डोळ्यासमोर जगजीत सिंग यांचे नाव समोर येते. तरलता, संवेदनशीलता, काव्यात्मकता आणि भावनिकता यांचा अतूलनीय संगम जगजीत यांच्या गायकीत होता. केवळ भारतातच नव्हे तर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचा मोठा चाहता आहे. जगजीत यांच्या  जन्मदिनानिमित्तानं  त्यांच्या गझल गायकीच्या प्रवासाचा घेतलेला आढावा खास चाहत्यांसाठी. आजारपणानं जगजीत यांचे अकाली निधन झाले. त्यांचे जाणे सर्वांसाठी धक्कादायक होते.

8 फेब्रुवारी 1941 ला जगजीत यांचा जन्म झाला. वो 'वो कागज की कश्ती', 'झुकी झुकी सी नजर', 'होंठों से छू लो तुम' यासारख्या त्यांच्या अनेक रचना या श्रोत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. आज जे गझल गायक आहेत त्यातील बहुतांशी गायक जगजीत यांना आपला गुरु मानतात. जगजीत यांच्या आवाजातील जादू म्हणजे त्यांच्या आवाजात जाणवणारी वेदना आणि  कातरता ही अफलातून होती. त्याचा योग्य त्यावेळी वापर करण्याची त्यांची शैलीही श्रोत्यांना  वेगळ्या दूनियेत घेऊन जात असे. आपल्या अनवट सूरांनी सर्वांना भारावून टाकणा-या जगजीत यांचा चाहतावर्ग मोठा होता.

राजस्थानातील श्रीगंगानगर गावात जगजीत यांचा जन्म झाला होता. त्यांचे पूर्ण नाव जगमोहन सिंग धीमन असे होते. 1970 ते 1980 च्या दशकात त्यांनी आपली पत्नी गायिका चित्रा सिंग यांच्यासमवेत वेगवेगळ्या प्रकारच्या गझला श्रोत्यांपुढे सादर केल्या. केवळ भारतातच नव्हे तर जगातही त्यांच्या गायकीला श्रोत्यांची पसंती मिळाली. चित्रा आणि जगजीत यांची ओळख रेडिओवर एका जाहिरातीच्या रेकॉर्डिंगच्यावेळी झाली होती. जगजीत यांच्या आवाजानं चित्रा यांनी तर त्यांच्या बरोबर गायला  विरोध केला होता. मात्र त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

1990 मध्ये चित्रा आणि जगजीत सिंग यांना मोठा धक्का बसला. तो म्हणजे त्यांचा मुलगा विवेक याचे कार अपघातात निधन झाले होते. त्यानंतर सहा महिने जगजीत काही बोलले नाही. त्यांनी मौन धारण केले. मात्र चित्रा या प्रसंगातून कधीही सावरल्या नाहीत. पुढे जगजीत यांच्या गायकीत त्यांच्या मुलाच्या जाण्याची सल व्यक्त होत होती. विवेकचं जाणं त्यांच्यासाठी वेदनाकारक होते. चित्रा यांनीही जगजीत यांच्या मौनानंतर गायकी सोडून दिली. 10 ऑक्टोबर 2011 मध्ये जगजीत यांचे निधन झाले. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com