रितेश देशमुखच्या माफीनाम्याने जिंकली मने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

सोशल मिडीयावर लोकांच्या आणि विशेषतः शिवभक्तांच्या टिकेला सामोरे जात असतानाच काही जणांनी मात्र रितेशच्या या माफीनाम्याला स्विकारल्याचे दिसत आहे आणि त्यावर सकारात्मकही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव आणि पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित मेघडंबरीत बसलेला सेल्फी काढल्याने त्यांच्यावर टिका होत आहे. पण यावर रितेशने फेसबुकवर लगेच माफीनाम्याची पोस्ट केली. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नसल्याचे आणि आमच्या चुकीमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागत असल्याचे त्याने पोस्ट मध्ये म्हटले आहे.

सोशल मिडीयावर लोकांच्या आणि विशेषतः शिवभक्तांच्या टिकेला सामोरे जात असतानाच काही जणांनी मात्र रितेशच्या या माफीनाम्याला स्विकारल्याचे दिसत आहे आणि त्यावर सकारात्मकही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. छायाचित्र घेतल्याने कोणाचे मन दुखले असेल तर माफी मागतो असे रितेशने फार नम्रपणे कबुल करत तिथल्या वातावरणाने भारावून गेल्याचे म्हटले आहे. या माफी नंतर काही लोकांनी हे फोटो घेण्यामागे काही चुकीचा वा महाराजांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता हे समजून घेतले आहे, असेच माफीनाम्यावर दिलेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे. 

'महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला मेघडंबरीपर्यंत जावे लागते. रितेशने पायात कुठलेही पादत्राण घातलेले नाही.' अशा काही  गोष्टींनाही सकारात्मक प्रतिक्रिया लोकांनी नमूद केले आहे. रितेशच्या माफीनाम्यावरुन तरी मेघडंबरीतील फोटो जाणीवपुर्वक काढले नसल्याचे दिसून येत आहे. 

 

 

 

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Positive reactions on riteish deshmukhs apology on Posting Photo On Social Media With Shiavji Maharaj Statue