esakal | प्रभासच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली, 'राधे श्याम'चा फर्स्ट लूक केला रिलीज
sakal

बोलून बातमी शोधा

 radhe shyam

प्रभासने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली असून त्याच्या लूक देखील प्रेक्षकांसमोर आणला आहे. या पोस्टरमध्ये प्रभास सुटा-बुटातील जेंटलमॅन दिसतोय तर अभिनेत्री पूजा हेगडे रेड गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसून येत आहे.

प्रभासच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली, 'राधे श्याम'चा फर्स्ट लूक केला रिलीज

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- बाहुबली फेम प्रभासच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. प्रभासने काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे त्याच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आज १० जुलै रोजी सकाळी १० वाजता रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजा हेगडे रोमँटीक पोजमध्ये दिसून येत आहे. या सिनेमाच्या पोस्टर रिलीजमधून सिनेमाचं नाव देखील जाहीर केलं आहे. प्रभास आणि पूजा यांच्या या सिनेमाचं नाव आहे 'राधे श्याम.'

हे ही वाचा: मलाईका अरोराने शेअर केलेली ही वोडका पॅनकेकची रेसिपी पाहिलीत का?

अभिनेता प्रभासच्या चाहत्यांना त्याच्या आगामी सिनेमाची उत्सुकत होती. 'बाहुबली' नंतर प्रभासचा 'साहो' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता मात्र 'साहो' प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही तसंच बॉक्स ऑफीसवर देखील फारशी कमाई करु शकला नाही त्यामुळे प्रभासचे चाहते नाराज झाले होते. आता मात्र प्रभासने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली असून त्याच्या लूक देखील प्रेक्षकांसमोर आणला आहे. 

या पोस्टरमध्ये प्रभास सुटा-बुटातील जेंटलमॅन दिसतोय तर अभिनेत्री पूजा हेगडे रेड गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसून येत आहे. या पोस्टरवरुन दोघेही रोमँटीक डान्स करतानाच्या पोझमध्ये दिसत आहेत. तसंच बॅकग्राऊंडला पूर किंवा पूरासारखं दृश्य देखील दिसत आहे. हे पोस्टर प्रभासच्या चाहत्यांना चांगलंच पसंत पडत आहे. हा सिनेमा राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा प्रभास आणि पूजा हेगडे ही जोडी ऑनस्क्रीन झळकणार असून त्यांची रोमँटीक केमिस्ट्री पडद्यावर पाहता येणार आहे. 'राधे श्याम' हा सिनेमा ४ भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे प्रभासने याचे इंग्रजी धरुन पाच पोस्टर रिलीज केले आहेत. २०२१ साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रभासने या सिनेमाचे पोस्टर सोशल मिडियावर रिलीज करताना म्हटलंय, 'माझ्या चाहत्यांनो, हे खास तुमच्यासाठी. मला आशा आहे की तुम्हाला आवडेल.' प्रभासने एका मुलाखतीत म्हटलं होतं की साहोनंतर त्याला एका रोमँटीक सिनेमात काम करायला आवडेल. तेव्हा या सिनेमात प्रभासचा रोमँटीक अंदाज पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.  

prabhas 20 film radhe shyam first look poster out romantic chemistry of prabhas pooja hegde  

loading image