प्रभासच्या जन्मदिनी त्याला "Beats Of Radhe Shyam" ची भेट 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 23 October 2020

येत्या काही दिवसांत राधे शाम नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचे पोस्टर रिलीज शुक्रवारी झाले आहे. ही गोष्ट जेव्हा प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर शेयर केली त्याला थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

मुंबई -दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेता प्रभासला त्याच्या जन्मदिनी एक चांगली भेट मिळाली आहे. येत्या काही दिवसांत राधे शाम नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचे पोस्टर रिलीज शुक्रवारी झाले आहे. ही गोष्ट जेव्हा प्रभासने आपल्या सोशल अकाऊंटवर शेयर केली त्याला थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एक वेगळी प्रेमकथा यानिमित्ताने समोर येणार आहे.

प्रभासबरोबर या चित्रपटात पूजा हेगडेही काम दिसणार आहे. या दोघांची एक अनोखी केमिस्ट्री रसिकांसाठी वेगळी ट्रीट ठरणार आहे. या दोघांचा जो पोस्टर रिलिज झाला आहे त्यात त्यांचे लुक्स कमालीचे सुंदर आहेत. त्याठिकाणचे छायाचित्रण लक्ष वेधून घेणारे आहे. सोबतीला असलेले सुश्राव्य संगीत यामुळे हे नव्याने प्रदर्शित झालेलं हे पोस्टर सर्वांच्या कौतूकाचा विषय ठरत आहे.

 

प्रभासने नुकतेच 41 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. "Beats Of Radhe Shyam" च्या लयीवर या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आली आहे. लैला- मजनु, रोमिओ-ज्युलिएट, सलीम- अनारकली, यांच्यासारख्या अजरामर प्रेमकथांशी नाते सांगणारी कथा म्हणून राधे शामचा उल्लेख करावा लागेल.

मागील काही दिवसांपूर्वी प्रभासने त्याच्या विक्रमादित्य या राधेशाम चित्रपटातील फस्ट लुक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यालाही प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती. सोशल मीडियावर तो व्हायरल झाला होता. आता त्याच्या या नव्या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Prabhas Birthday Feel The Beats Of Radhe Shyam