Prajakta Mali
Prajakta MaliInstagram

Prajakta Mali:'आनंद,समाधान,धाकधूक..', प्राजक्ताच्या पोस्टनं चर्चेला उधाण

गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी लोकांना गूड न्यूज देणार असल्याचे संकेत देतेय त्यामुळे सोशल मीडियावर तरी तिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
Published on

Prajakta Mali: प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. ती अनेकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत आलेली पहायला मिळते.

प्राजक्ता अनेकदा राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर देखील भाष्य करताना दिसते. पण त्यामुळे मात्र तिला ट्रोल व्हावे लागते. तिचे असंख्य चाहते आहे. सोशल मीडियावर तर तिच्या फॅन्सची संख्या वाढतानाच दिसते आहे. (Prajakta Mali marathi actress Post viral)

Prajakta Mali
Bigg Boss Marathi 4: हे आहेत Top 3! प्रेक्षकच नाही तर अख्ख्या मराठी इंडस्ट्रीनं घेतली 'या' तिघांची नावं

अनेकांना प्राजक्ताच्या प्रोफेशनल लाइफ विषयी खूप काही माहित आहे पण यातच चाहत्यांचे समाधान होत नसते. त्यांना अधिक उत्सुकता असते ती कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात. आता प्राजक्ताच्या बाबतीत यामध्ये सर्वात पहिलं स्थान आहे ते प्राजक्ता लग्न कधी करणार? या प्रश्नाचं. त्याचबरोबर अनेकांना माहित करुन घ्यायचं आहे की तिच्या आयुष्यात कुणी आहे का? आता प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट केलीय त्यामुळे चाहत्यांना आता या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची ओढ पुन्हा लागली आहे.

प्राजक्ता गेल्या काही दिवसांपासून आता राहिले सहा दिवस, पाच दिवस,चार दिवस..वाट पहा अशा पद्धतीची पोस्ट करताना दिसतेय. त्यात त्या पोस्टना ती ज्या पद्धतीचं कॅप्शन देतेय त्यानं आता तिच्या पोस्टची नुसती चर्चा होत नाहीय तर त्याला उधाण आलंय. कारण नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये तिनं छान व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तिच्या कानात,पायात,हातात,गळ्यात पारंपरिक आभुषणं दिसत आहेत...बॅकग्राऊंडला छान उत्साही संगीताचे सूर कानावर पडत आहेत.

Prajakta Mali
Prajakta Mali: 'फक्त दोन दिवस वाट पहा..'; प्राजक्तानं व्हिडीओ शेअर करत वाढवली नेटकऱ्यांची उत्सुकता

आणि प्राजक्ता मॅडमनी पोस्टला कॅप्शन दिलं आहे की, ''नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही…

त्यासाठी “वाट बघा” 🤪…

.भेटूया उद्या ५.३० वाजता - Insta live वर…🙏

नक्की या.

#आनंद #समाधान #धाकधूक #नवंकाहितरी #prajakttamali @♥️आनंद,समाधान,धाकधूक..नवं काहीतरी...''

आता उद्या प्राजक्ताच्या या पोस्टमागचं रहस्य उलगडणार आहेच. तेव्हा एक अंदाज देऊन ठेवतो की प्राजक्ता लग्न वगैरे करत नाहीय तर ती लवकरच बिझनेस वूमन बनणार आहे. तिचा नवीन ज्वेलरी ब्रान्ड 'प्राजक्तराज' घेऊन ती आपल्या भेटीस येत आहे. तेव्हा वाट पाहूया उद्याची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com