
Prakash Raj: ते फक्त भुंकतात... प्रकाश राज कुणावर एवढे भडकले?
'बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' चित्रपटने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातल आहे. या चित्रपट भारतात 500 कोटी आणि जगभरात 1000 कोटींचा आकडा पार करणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 13 दिवस झाले आहेत. तरी या चित्रपटाची कमाई सुरुचं आहे.
पठाण चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यापासूनचं या विरोधात वाद झाला होता. त्यातच या चित्रपटातील गाणंही वादात सापडलं होतं. त्यामुळे या चित्रपटावर बॉयकॉटचे ढग दाटल्याचं दिसत होतं मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो रोजच नवनवीन विक्रम करत आहे. पठाण यांच्याविरोधात सोशल मीडियावर बहिष्काराच्या ट्रेंडचा काहीही परिणाम झाला नाही.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक कलाकारांनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या. आता त्यातच साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांनी पठाणचे यश पाहून बॉयकॉट गँगवर संताप व्यक्त केला आहे.
आपली प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की, त्यांना पठाणवर बंदी घालायची होती. हे मूर्ख ज्यांना पठाणांवर बंदी आणायची होती. त्याचे कलेक्शन 700 कोटी होणार आहे. या कलेक्शन बॉयकॉट टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोदींच्या चित्रपटाला ३० कोटींपर्यंतही ते नेऊ शकले नाहीत. ते फक्त भुंकत आहेत. ते चावत नाहीत. काळजी करू नका हे फक्त ध्वनी प्रदूषण आहे बाकी काही नाही.
प्रकाश राज यांनी नुकतेच केरळमधील एका साहित्य महोत्सवात सहभाग घेतला होता.. प्रकाश राज यांच्यासोबत कबीर बेदी, अमिताव घोष आणि सुधा मूर्ती देखील या कार्यक्रमाचा भाग होते. यादरम्यान प्रकाश यांना बॉयकॉट पठाणबाबत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली.