Prasad - Amruta: प्रसादने हातावर काढली अमृताच्या नावाची खास मेहंदी, फोटो बघाच

प्रसाद जवादे - अमृता देशमुख लवकरच लग्न करणार आहेत
prasad jawade amruta deshmukh mehendi photos viral on social media
prasad jawade amruta deshmukh mehendi photos viral on social mediaSAKAL

Prasad Jawade- Amruta Deshmukh Mehendi: प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील जोडपं. प्रसाद - अमृता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रसाद - अमृताची लगीनघाई सुरु आहे.

प्रसाद - अमृता यांच्या मेहंदीसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये प्रसादने स्वतःच्या हातावर अमृताचं खास नाव कोरलेलं दिसतंय.

prasad jawade amruta deshmukh mehendi photos viral on social media
Nana Patekar: मी तर अंघोळ करुन फक्त... नाना पाटेकरांकडून मार खाल्लेल्या चाहत्याने सोडलं मौन, काय म्हणाला बघा

प्रसादने हातावर लिहीलं अमृताचं हे खास नाव

प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे मनोरंजन विश्वातील चर्चेतलं कपल. बिग बॉस मराठी 4 मुळे दोघांमध्ये छान मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी एकमेकांच्या नात्याची कबुली दिली.

प्रसाद - अमृताच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. या फोटोत प्रसादने त्याच्या हातावर अमृतमय जाहलो अशी खास मेहंदी कोरलीय. या दोघांच्या या फोटोंवर त्यांच्या फॅन्सनी पसंती दर्शवलीय.

या तारखेला प्रसाद - अमृता करणार लग्न

काही महिन्यांपुर्वी प्रसाद - अमृताने साखरपुड्याचे फोटो शेयर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. याशिवाय त्यांनी काल ग्रहमख विधीचे फोटो शेअर केले होते

हे दोघं उद्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जातंय. प्रसाद - अमृता यांच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com