Prasad Oak Vadapao: प्रसाद ओक लंडनमध्ये बनवणार गोड - तिखट 'वडापाव', काय आहे प्रकरण जाणुन घ्या

प्रसाद ओक थेट लंडनमध्ये वडापाव बनवणार आहे
prasad oak new directorial movie vadapav after chandramukhi dharmaveer shooting starts in london
prasad oak new directorial movie vadapav after chandramukhi dharmaveer shooting starts in london SAKAL
Updated on

Prasad Oak Vadapao Movie News: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. प्रसादला आपण धर्मवीर सिनेमात आनंद दिघेंच्या भुमिकेत पाहीलं.

याशिवाय अमृता खानविलकरची प्रमुख भुमिका असलेल्या चंद्रमुखी सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं.

आता प्रसाद ओक थेट लंडनमध्ये वडापाव बनवणार आहे. तुम्हाला वाटलं असेल प्रसाद लंडनमध्ये वडापावचं हॉटेल उघडणार का, तर असं नाही.

prasad oak new directorial movie vadapav after chandramukhi dharmaveer shooting starts in london
Ranjeet Jog Wedding: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, वडीलांनी रामायण मालिकेत केलंय काम

प्रसाद ओक वडापाव नावाचा सिनेमा दिग्दर्शित करतोय. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून

लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला 'वडापाव' हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. प्रसाद ओक पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.

प्रसाद दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव 'वडापाव' असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे. लंडनमध्ये नुकताच या चित्रपटाचा मुहुर्त सोहळा संपन्न झाला.

आता प्रतिक्षा आहे ती जगप्रसिद्ध असलेला रुचकर वडापाव चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडणार याची.

प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणे,गौरी नलावडे,अभिनय बेर्डे,रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर,शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी 'वडापाव' चित्रपटाविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.

दिग्दर्शक प्रसाद ओक चित्रपटाविषयी सांगतात की प्रेमाला,लग्नाला आणि वडापाव खाण्याला वयाचं बंधन कधीही नव्हतं,नाही आणि नसेल. असं म्हणतात की “पुरुषाच्या मनात जाण्याचा रस्ता पोटातून जातो.”

ह्या घरातल्या पुरषांच्या मनापर्यंत जाण्याच्या रस्त्यावर अनेक चमचमीत आणि झणझणीत जिन्नस आहेत, त्याची चव घ्यायला तयार रहा.

या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत,प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन,तबरेज पटेल,सनिस खाकुरेल हे आहेत. या चित्रपटाचे लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे.

तसंच,चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे आहे.संगीतकार कुणाल करण 'वडापाव' या आगामी चित्रपटाचे संगीतकार आहेत तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. तेव्हा तयार रहा घमघमीत वडापावची झणझणीत चव अनुभवायला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.