Prashant Damle: शैक्षणिक क्षेत्रासाठी निधी उभारण्यासाठी प्रशांत दामले अमेरिकेत करणार नाटकांचे खास प्रयोग

प्रशांत दामले नाटकाच्या माध्यमातुन शैक्षणिक निधी उभारणार आहेत
Prashant Damle's big initiative for the education sector, will raise funds for students
Prashant Damle's big initiative for the education sector, will raise funds for students SAKAL

प्रशांत दामले हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते. प्रशांत दामले हे मराठी रंगभुमीवरचे लोकप्रिय अभिनेते मानले जातात. प्रशांत दामले यांनी आजवर विविध प्रयोग करुन मराठी रंगभुमीवर नाटकांचे रेकॉर्डब्रेक प्रयोग केले.

नाटकांचे प्रयोग करण्यासाठी प्रशांत आता अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी कारण सुद्धा तसंच काहीसं खास आहे. शैक्षणिक निधी उभारण्यासाठी प्रशांत दामले अमेरिकेत नाटकांचे प्रयोग करणार आहेत.

(Prashant Damle's big initiative for the education sector)

Prashant Damle's big initiative for the education sector, will raise funds for students
Sunny Leone: सनी लिओनीने ऑटिस्टिक मुलांसोबत केला रॅम्प वॉक! साजरा केला आनंद

प्रयोगांमधुन उभारणार शैक्षणिक निधी

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शैक्षणिक निधी उभारणीसाठी प्रशांत दामले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांचा अमेरिका दौरा करणार आहेत.

८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘नियम व अटी लागू’ चे प्रयोग तर ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होतील.

या दोन नाटकांचे २१ कलाकार ६ आठवड्यात तब्बल २१ प्रयोग सादर करणार आहेत. या प्रयोगांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा बृहन्महाराष्ट्र मंडळ शैक्षणिक निधी उभारणीसाठी देण्यात येणार आहे.

त्यातून २०२३ मध्ये १३-१८ वयोगटातील १०० मुलामुलींसाठी $३०,००० आणि २०२४ मध्ये ५०० मुलामुलींसाठी अंदाजे $१५०,००० असा $२ मिलीयनचा फंड उभारण्याचा बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप दीक्षित ह्यांचा मानस आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचा पुढाकार

अमेरिकेन राहणाऱ्या मराठी मुलांचे मराठी भाषेशी नाते अतूट राहावे या उद्देशाने बृहन्महाराष्ट्र मंडळ हा नवीन उपक्रम राबवत आहे.

या उपक्रमासाठी प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमने पुढाकार घेतला आहे. प्रशांत दामले आणि सर्व मंडळी उत्तर अमेरिकेतील मराठी भाषिकांसाठी एक खास गोष्ट करणार असल्याची माहिती बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप दीक्षित यांनी सांगितले.

Prashant Damle's big initiative for the education sector, will raise funds for students
Aniket Vishwasrao: "४ दिवस झाले सामानाची बॅग हरवलीय", अनिकेत विश्वासरावसोबत घडली संतापजनक घटना

कामगारांसाठीही उभारलाय मदतीचा हात

या उपक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल बोलताना प्रशांत दामले सांगतात, "कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे. माझे आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संबंध पूर्वापार अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

कोविड काळात बृहन्महाराष्ट्र मंडळाने आमच्या रंगमंच कामगारांसाठी स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. आणि आता ह्या अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रमात मला आणि माझ्या टीमला सहभागी करून घेतल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे."

प्रशांत दामले अमेरिका दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत, अशी चर्चा आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com