Prathamesh Laghate: प्रथमेशला बायकोचं भारी कौतुक! मुग्धासाठी शेअर केली खास पोस्ट

Prathamesh Laghate: मुग्धावर सोशल मीडियावरच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच प्रथमेश लघाटेनं (Prathamesh Laghate) देखील मुग्धासाठी खास पोस्ट शेअर करुन तिचं कौतुक केलं आहे.
Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan
Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan
Updated on

Prathamesh Laghate And Mugdha Vaishampayan: गायिका मुग्धाचं लघाटे (Mugdha Vaishampayan) हिनं माझा मास्टर्स इन क्लासिक वोकलमध्ये पदवी प्राप्त केली आहे. नुकताच मास्टर्स इन क्लासिक वोकलचा पदवी प्रदान समारंभ मुंबई युनिवर्सिटीमध्ये पार पडला. यावेळी मुग्धाला गोल्ड मेडल देखील देण्यात आलं. आता मुग्धावर सोशल मीडियावरच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच प्रथमेश लघाटेनं (Prathamesh Laghate) देखील मुग्धासाठी खास पोस्ट शेअर करुन तिचं कौतुक केलं आहे.

प्रथमेशनं शेअर केली खास पोस्ट

प्रथमेशनं मुग्धाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मुग्धाच्या हातात मेडल दिसत आहे. या फोटोला प्रथमेशनं कॅप्शन दिलं, "प्रिय बायको, अभिनंदन! मला तुझा अभिमान वाटतो"

Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan
Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan

मुग्धानं देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, "मास्टर्स इन क्लासिकल वोकल-गोल्ड मेडल पदवी प्रदान समारंभ मुंबई युनिवर्सिटी येथे आज सकाळी संपन्न झाला. त्यानंतर लगेच मी कारंजाला आले. अगदी आजच्याच दिवशी श्री गुरुमंदिरामध्ये प्रथेप्रमाणे श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांसमोर गायनसेवा दत्त महाराजांनीच करवून घेतली. अजून काय हवं?"

Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan
Prathamesh Laghate, Mugdha Vaishampayan

मुग्धा आणि प्रथमेश यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com