Prathamesh Parab Wedding : 'एकदम टकाटक', दगडुची हळद अन् फुल्ल टू कल्ला! प्रथमेशच्या 'हळदी अन् मेहंदींचे' फोटो व्हायरल

टाईमपास फेम दगडुच्या (Prathamesh Parab Haldi Photo) हळदीच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Prathamesh Parab haldi viral photo
Prathamesh Parab haldi viral photoEsakal

Prathamesh Parab Haldi Photos: मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रथमेश परबच्या हळदी अन् मेहंदी सोहळ्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा रंगली असताना दगडु फेम प्रथमेश परबच्या हळदी अन् मेहंदींच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

सध्या मराठी मनोरंजन विश्वात वेडिंग सीझन सुरु असल्याचे दिसून येते. यापूर्वी शिवानी सुर्वे, अजिंक्य ननावरे,गौरी देशपांडे, स्वानंद तेंडूलकर, स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्यात दगडुच्या हळदीच्या फोटोंनी नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

टाईमपास चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्रथमेशच्या हळदीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. येत्या २४ फेब्रुवारीला प्रथमेश क्षिजिताचं लग्न पार पडणार असून त्याला मराठी चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रेटी हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. प्रथमेशनं त्याच्या इंस्टावरुन हळदी समारंभाचे फोटो शेयर केले आहेत.

प्रथमेशच्या होणाऱ्या पत्नीनं क्षितिजानं देखील सोशल मीडियावरुन शेयर केलेले फोटो चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. तिनं आपल्या लग्नासाठी प्रतिजा नावाचा खास हॅशटॅग तयार केला आहे.

प्रथमेशच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्यानं रवी जाधव दिग्दर्शित टाईमपास नावाच्या चित्रपटातून आपल्या करिअऱला सुरुवात केली होती. खरं तर क्षितिजा आणि प्रथमेशच्या लवस्टोरीची सुरुवात देखील याच चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या दरम्यान झाली होती असे सांगितले जाते.

Prathamesh Parab haldi viral photo
Prathamesh Parab: साखरपुड्यानंतर प्रथमेश परब पोहोचला सासुरवाडीत; शेअर केले श्रीवर्धनमधील खास फोटो

यापूर्वी देखील प्रथमेश परब आणि त्याची मैत्रीण क्षितीजाच्या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट होत्या. त्यानं आपल्या लवस्टोरीविषयी चाहत्यांना खास अंदाजात सांगितले होते. ती इंस्टास्टोरी देखील चाहत्यांना आवडली होती. वेगळ्या पद्धतीनं त्यानं आपल्या प्रेमाची सांगितलेली गोष्ट चाहत्यांच्या कमेंटचा विषय होऊन गेली. आगामी काळात प्रथमेश वेगवेगळ्या मराठी प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com