esakal | 'मुलीच्या मृत्यूनंतर सगळं काही गमावलं,' प्रत्युषा बॅनर्जीचे आईवडील आर्थिक संकटात
sakal

बोलून बातमी शोधा

Pratyusha Banerjee

'मुलीच्या मृत्यूनंतर सगळं काही गमावलं,' प्रत्युषा बॅनर्जीचे आईवडील आर्थिक संकटात

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दिवंगत टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या Pratyusha Banerjee आईवडिलांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. कायदेशीर बाबींमुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. २०१६ साली मुंबईतल्या राहत्या घरी प्रत्युषाचा मृतदेह आढळला होता. 'बालिका वधू' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. प्रत्युषाच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहवर आरोप केले होते. या खटल्यात सर्व संपत्ती, पैसा खर्ची लावल्याचं तिच्या वडिलांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. (Pratyusha Banerjees parents are penniless fighting her case Lost everything slv92)

"प्रत्युषाच्या निधनानंतर जणू एखाद्या वादळाचं संकटच आमच्या कुटुंबावर ओढावलं आणि आमच्याकडून सर्वकाही हिरावून घेतलं. आमच्याकडे पैसा शिल्लक राहिला नाही. दुसऱ्या खटल्यात आम्ही सर्वकाही गमावलं", अशा शब्दांत प्रत्युष्याचे वडील शंकर बॅनर्जी यांनी व्यथा मांडली. 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

"आम्हा सर्वांना आता सिंगल रुममध्ये रहावं लागतंय. या खटल्याने आमच्याकडून सर्वकाही हिरावून घेतलं. अनेकदा आम्हाला कर्जसुद्धा घ्यावं लागलं", असं त्यांनी सांगितलं. प्रत्युषाची आई बाल संगोपन केंद्रात काम करत असून तिचे वडील कथालेखनाचं काम करतात. प्रत्युषाच्या मृत्यूमागे कोण होतं, याचा शोध लावणारच असा प्रण शंकर बॅनर्जी यांनी केला आहे.

हेही वाचा: शिल्पा शेट्टीच्या बहिणीच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

प्रत्युषाच्या निधनाच्या तीन महिन्यांनंतर मुंबई हायकोर्टाने राहुलचा अटकपूर्व जामिन मंजूर केला. डिसेंबर २०१६ मध्ये आम्ही लग्न करणार होतो, मात्र तिच्या आईवडिलांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे प्रत्युषा फार व्यथित आणि निराश झाली होती, असं राहुलने म्हटलं होतं. दोन वर्षांपूर्वी राहुलने सलोनी शर्माशी लग्नगाठ बांधली. "प्रत्युषाच्या निधनानंतर माझं आयुष्य एका टीव्ही शोसारखं झालं होतं आणि मी अजूनही आनंदी राहण्यासाठी धडपडतोय. माझ्या कुटुंबीयांनी यात माझी खूप साथ दिली," असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता. प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा राहुल राज सिंहविरोधात दाखल करण्यात आला होता.

loading image
go to top