लंडनच्या मंडईत प्रवीण तरडेंना भेटला मराठी भाजीविक्रेता, Video मधून केलं आवाहन

हंबीरराव,धर्मवीर सारखे सिनेमे दिग्दर्शित करणारे प्रवीण तरडे सध्या लंडनमध्ये शूटिंग निमित्तानं गेले आहेत.
london pravin  tarde
london pravin tardeesakal

मराठी माणूस व्यापार करायला घाबरतो असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. अर्थात त्यात थोडफार तथ्य असलं तरी आज अशी काही मराठी माणसांची नावं घेता येतील ज्यांनी व्यापार करुन आपलं नाव बड्या व्यावसायिकांच्या यादीत सामिल केलं आहे. आता त्यांची उजळणी इथं करण्यापेक्षा थेट विषयावर येऊया. हे सगळं सांगण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे अभिनेता,लेखक,दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा(Pravin Tarde) लंडनमधील इंडरनॅशनल भाजी मार्केटमधून व्हायरल झालेला व्हिडीओ. हंबीररावच्या दिग्दर्शकांन आपला लंडनमधील तो व्हिडीओ पोस्ट करत तिथे असलेल्या मराठी व्यापारांची ओळख करुन देताना सबंध महाराष्ट्रातील फळं आणि भाजी व्यापाऱ्यांना एक आवाहन केलं आहे. जे खरंतर व्यापार करु पाहणाऱ्यांच्या हिताचेच आहे. नेमकं काय म्हणालेत प्रवीण तरडे त्या व्हिडीओतून. चला जाणून घेऊया...(Pravin Tarde In London's International Fruits and Vegitable market, Video Viral)

प्रवीण तरडे खरंतर सध्या त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंग निमित्ताने लंडनमध्ये गेले आहेत. पण शूटिंग एक दिवस बंद असल्या कारणानं प्रवीण तरडे पोहोचले थेट लंडनच्या इंटरनॅशनल मंडईत. तिथे त्यांना कळलं की जिथे लाखो-करोडोचा व्यापार होता, भाजी-फळांची मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात होते त्या मार्केटवर वर्चस्व आहे मराठी माणसांचे. मग काय तरडेच ते त्यांनी या दोन मराठी वीरांना शोधलं,एक चिपळूणचा सचिन कदम आणि एक पुण्याचा नीरज रत्तू, या दोघांनी कसं लंडन गाठलं, कशी महाराष्ट्रातून भाजी इथे आणत त्यांनी व्यापार सुरु केला आणि महाराष्ट्रातील भाजीला जगात कसं ते निर्यात करतात यामागची सगळी धावपळ लक्षात घेऊन एक त्याचा माहितीपूर्ण व्हिडीओ तयार केला.

london pravin  tarde
हिंदी भाषिक राज्यात का चालतायत साऊथचे सिनेमे? किच्चा सुदीप स्पष्टच बोलला..

हा व्हिडीओ करण्यामागे तरडे म्हणाले,''माझा एकच हेतू की सचिन,नीरज सारखेच महाराष्ट्रातील तरुण भाजी-फळ व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय वाढवावा''. या व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना तरडे यांनी सचिन-नीरजच्या मदतीनं आपला व्यवसाय वाढवण्याचं आवाहन केलं आहे. तरडे यांच्या त्या व्हिडीओची लिंक बातमीत जोडली आहे. सविस्तर पाहिलात की तरडेंचा चांगला हेतू आपल्या लक्षात येईलच. आणि आपल्यापैकी कोणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या शेतातील भाजी-फळांचा व्यापार करायचा असेल तर नक्कीच तरडेंच्या या व्हिडीओचा फायदा होणार हे १०० टक्के.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com