esakal | पार्टीतील फोटोंमुळे गरोदर नुसरत जहां ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'ड्रग्ज घेतले का?'
sakal

बोलून बातमी शोधा

nusrat jahan

पार्टीतील फोटोंमुळे गरोदर नुसरत जहां ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'ड्रग्ज घेतले का?'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहां Nusrat Jahan सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नुसरत या गरोदर असून त्यांच्या मैत्रिणींनी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील नुसरत यांचे मैत्रिणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र हे फोटो पाहून नेटकऱ्यांना वेगळाच प्रश्न पडला आहे. मैत्रिणींसोबत मिळून नशा केली का, असा सवाल नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारला आहे. नुसरत यांची मैत्रीण तनुश्रीने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (pregnant nusrat jahan trolled for party pictures with friends)

सोशल मीडियावरील या फोटोंमध्ये नुसरत यांच्यासोबत दोन मैत्रिणी दिसत आहेत. या तिघींचा सेल्फी पाहून त्यांनी ड्रग्ज घेतलेत की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. नुसरत जहां त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहेत. उद्योगपती निखिल जैनशी लग्न केलं नसल्याचं सांगून त्यांनी काही दिवसांपूर्वीच सर्वांना मोठा धक्का दिला होता. २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैनशी नुसरत यांनी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांचा हा कौटुंबिक वाद सर्वांसमोर आला आहे.

हेही वाचा: खासदार नुसरत जहाँचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल

नुसरत आणि निखिल गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. तर दुसरीकडे नुसरत या अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत. यशने १७ फेब्रुवारी २०२१ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्याने बंगालच्या निवडणूकीमध्ये चंडीतला या मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्याला अपयश मिळाले. यश हा अभिनेता, मॉडेल आणि राजकारणी आहे.

loading image